शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Honey Trap: हनी ट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानसाठी हेरगिरी, परराष्ट्र खात्यातील वाहन चालकाला घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 08:03 IST

Honey Trap: हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आलेला केंद्रीय परराष्ट्र खात्याचा एक वाहन चालक गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवीत होता. या हेरगिरीचे कारस्थान उजेडात आले असून, त्या वाहनचालकाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी दिल्ली : हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यात आलेला केंद्रीय परराष्ट्र खात्याचा एक वाहन चालक गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवीत होता. या हेरगिरीचे कारस्थान उजेडात आले असून, त्या वाहनचालकाला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या वाहनचालकाला दिल्लीतील जवाहरलाल नेहरू भवन येथून शुक्रवारी अटक करण्यात आली. गोपनीय माहिती व काही कागदपत्रे एका पाकिस्तानी व्यक्तीला पाठविताना त्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या माहितीच्या बदल्यात त्याला पैसे मिळणार होते. हनी ट्रॅपद्वारे महत्त्वाच्या खात्यातील, तसेच विभागातील लोकांना अडकवून त्यांच्याकडून हेरगिरीची कामे करवून घेतली जातात. भारतामध्ये याआधीही अशा प्रकरणांमध्ये काही लोकांना अटक करण्यात आली होती.

‘सहानभूतीसाठी पाकिस्तानचे प्रयत्न’पाक काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा टोला भारताने लगावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पाकने काश्मीरच्या विषयावर वक्तव्य केले, त्यामुळे भारताने पाकची कानउघाडणी केली आहे. भारताचे प्रतिनिधी प्रतीक माथुर म्हणाले की, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे पाकने नीट लक्षात ठेवावे. पाकला कांगावा करण्याची सवय लागली आहे. 

‘पूनम शर्मा नावाने अडकला जाळ्यात’पूनम शर्मा किंवा पूजा असे नाव धारण करून पाकिस्तानी व्यक्तीने परराष्ट्र खात्यातील वाहनचालकावर मोहिनी घातली होती, तसेच पैशाच्या आमिषानेही तो हेरगिरी करू लागला होता. याची कुणकुण लागताच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी त्याच्यावर बारीक नजर ठेवली होती. अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. 

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपCentral Governmentकेंद्र सरकारPakistanपाकिस्तान