शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 23:22 IST

खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असताना आता भारतावर एक मोठा आणि खोटा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पहली प्रतिक्रिया समोर आली आहे. खरे तर, भारत यूक्रेनला दारू-गोळा पाठवत असल्याचा दावा रॉयटर्सच्या एका वृत्तात करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी रॉयटर्सचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

सर्व आरोप पूर्णपणे निराधार -यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत. कारण भारताने कुठलाही नियम तोडलेला नाही. आम्ही रॉयटर्सचे वृत्त बघितले आहे. हे पूर्णपणे अंदाजांवर आधारलेले असून यात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही.

चुकीचे आणि खोडसाळपणाचे आरोप -भारताने रॉयटर्सचे वृत्त खोडसाळपणाचे आणि पुर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे की, "भारत आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांचे पूर्ण निष्पक्षपणे पालन करतो. निर्यातीसाठीही भारताचे एक मजबूत कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क आहे. संरक्षण सामग्रीच्या निर्यातीत भारताचे रेकॉर्ड निष्कलंक आहे. अंतिम वापरकर्त्याच्या जबाबदाऱ्या आणि प्रमाणपत्रांचे देखील सर्व निकषांप्रमाणे मूल्यांकन केले जाते. रॉयटर्सच्या वृत्तात भारताची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे."

सर्व कामे कायदेशीर आहेत -परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, 'संरक्षणासंदर्भातील निर्यातीसाठी सर्व आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पूर्णपणे पालन होईल, हे सुनिश्चित केले जाते. या अंतर्गत कसल्याही प्रकारची चूक होण्यास वाव नाही. भारतातील सर्व उपक्रम पूर्णपणे कायद्याच्या कक्षेत आहेत आणि कधीही कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही."

रॉयटर्सच्या वृत्तात नेमके काय? -उत्पादकांकडून विकली गेलेली भारतीय शस्त्रास्त्रे युरोपमार्गे युक्रेनमध्ये पोहोचली आहेत, यात तोफगोळ्यांचाही समावेश आहे,  असा दावा रॉयटर्सच्या वृत्तात करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, रशियाने या प्रकरणात हस्तक्षेप केला. मात्र, भारताने ही खरेदी-विक्री रोखण्यासाठी कसलेही पाऊल उचलले नाही. तसेच शस्त्रांस्त्रांची निर्यात एक वर्षापासून सुरू असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया