शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

एस.पींनी खडसेंचे सीडीआर कोणाच्या सांगण्यावरून काढले? मनीष भंगाळेचा सवाल : मुंबई एटीएसचा दबाव येत असल्याचा आरोप

By admin | Updated: June 3, 2016 22:44 IST

जळगाव: जळगावात कोणतीही चौकशी अथवा गुन्हा दाखल झालेला नसताना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महसूमंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड (सीडीआर) कोणाच्या सांगण्यावरून काढले असा सवाल करत या प्रकरणात सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप एथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला. दरम्यान, याप्रकरणात पंधरा दिवस काहीच हालचाली न करणारी एटीएस आता स्टेटमेंटसाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचेही भंगाळे म्हणाला.

जळगाव: जळगावात कोणतीही चौकशी अथवा गुन्हा दाखल झालेला नसताना पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी महसूमंत्री एकनाथराव खडसे यांचे मोबाईल फोनचे रेकॉर्ड (सीडीआर) कोणाच्या सांगण्यावरून काढले असा सवाल करत या प्रकरणात सुपेकर यांचा सहभाग असल्याचा आरोप एथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला. दरम्यान, याप्रकरणात पंधरा दिवस काहीच हालचाली न करणारी एटीएस आता स्टेटमेंटसाठी आपल्यावर दबाव टाकत असल्याचेही भंगाळे म्हणाला.
जिल्हा पत्रकारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भंगाळे याने दाऊदच्या कराची येथील निवासस्थानावरुन खडसेंना आलेल्या कॉल्सची माहिती दाखवून त्याचा डेमो सादर केला. दाऊदच्या पत्नीच्या क्रमांकावरून खडसेंच्या मोबाईलवर सात वेळा संभाषण झाले आहे. यावेळी मार्च व एप्रिलचे बील त्याने दाखविले. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केल्याचे भंगाळे याने सांगितले.
ई-मेलचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न
गेल्या तीन दिवसापासून दररोज रात्री दहा वाजता माझ्या ई-मेल आयडीचा पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न कोणाकडून तरी केला जात आहे. याबाबत मी मुंबई पोलिसांना विचारणा केली असता आमच्याकडून असा प्रयत्न होत नाही. गरज वाटेल तेव्हा आम्ही तुमच्याकडून हा पासवर्ड घेऊ शकतो, असे उत्तर मला देण्यात आले. एकूण तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे भंगाळे म्हणाला.
खडसे मंत्री असल्याने कारवाईस विलंब
आंतरराष्ट्रीय कॉल्सचे प्रकरण देशाशी निगडित विषय असताना, खडसे हे केवळ मंत्री व सत्ताधारी पक्षाचे असल्याने त्यांच्यावर कारवाईस विलंब होत आहे. तसेच पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी देशहिताच्या दृष्टिकोनातून सीडीआर काढले असते तर मग एकट्या खडसेंचेच का? अन्य चार जणांचे का नाही काढले. हे प्रकरण मुंबई सुरू असताना जळगावात त्याची तक्रार अथवा गुन्हाही दाखल नाही, याचाच अर्थ खडसेंना वाचविण्यासाठीच सुपेकरांनी हे सीडीआर काढले असा आरोप भंगाळे याने केला.