शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग असल्याने क्रीडा संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना विमानात नाकारला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 08:28 IST

व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सचा भेदभाव; तिकिटाचे पैसे परत द्यायलाही नकार

दीपक भातुसे 

मुंबई : बाली येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी निघालेल्या भारतीय पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना दिव्यांग असल्याने व्हिएटजेट इंडिया (Vietjet India) एअरलाइन्सने विमानात प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला आहे. या प्रकारामुळे प्रभू व्यथित झाले आहेत.

बाली येथे २० ते २४ सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेत भारतासह जगभरातील १६ देश सहभागी होणार आहेत. अरविंद प्रभू हे माजी आमदार आणि मुंबईचे माजी महापौर रमेश प्रभू यांचे चिरंजीव आहेत. ९५ टक्के दिव्यांग असलेले अरविंद प्रभू व्हीलचेअरवर असतात. परदेशात विमानाने जायचे असेल तर त्यांच्याबरोबर अटेेंडंट घेऊनच ते प्रवास करतात.  पिकलबॉलच्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी रात्री बालीला रवाना झाला. अरविंद प्रभू आणि त्यांच्या चार अटेंडंटचे खेळाडूंच्या विमानानंतर एका तासाने रात्री १.२५ चे विमान होते. त्यासाठी ते शनिवारी रात्री १० वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले. चेकिंग काउंटरवर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्याने प्रभू यांचा बोर्डिंग पास न देता त्यांच्यासोबत असलेल्या चार जणांचे बोर्डिंग पास दिले. लो कॉस्ट एअरलाइन्स असल्याने दिव्यांगांसाठी केबिन चेअर नसल्याचे सांगत प्रभू यांना प्रवास करता येणार नाही, असे व्हिएतनामच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

...म्हणे रीतसर तक्रार करा  अरविंद प्रभू यांनी या प्रवासासाठी पाच लाख रुपये खर्च केले होते. विमानात प्रवेश नाकारल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मागितले असता रीतसर तक्रार करा त्यानंतर बघू असे सांगण्यात आले. इतर चार जणांना आम्ही प्रवास करण्यास अडवले नव्हते, त्यामुळे त्यांच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार नाहीत, असे उत्तर व्हिएटजेट इंडिया एअरलाइन्सने दिले. 

मी मागील ३५ वर्षांत अनेक देशांचा प्रवास केला आहे. दिव्यांग असल्याने मला नेहमी अटेंडंट घेऊन जावे लागतात. त्यामुळे मी लो कॉस्ट एअरलाइन्सनेच प्रवास करतो. याआधी मला कधीच विमान प्रवासापासून रोखण्यात आले नव्हते.- अरविंद प्रभू, अध्यक्ष, भारतीय पिकलबॉल असोसिएशन

टॅग्स :airplaneविमान