शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न साकार झालं, दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या कुलगुरुपदी महिला खेळाडूला बहुमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 18:07 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली स्पोर्ट युनिव्हर्सिटी सुरू होत आहे, आमचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालंय.

ठळक मुद्देमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली स्पोर्ट युनिव्हर्सिटी सुरू होत आहे, आमचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालंय.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेनं 2019 वर्षीच विधानसभेच्या सत्रामध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे विधेयक पारीत केलं होत. कोरोना महामारी अन् लॉकडाऊनमुळे हे काम मागे पडले होत. मात्र, आता लवकरच स्पोर्ट्स विद्यापीठ उभारले जाणार असून दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू म्हणून ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूला बहुमान देण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली स्पोर्ट युनिव्हर्सिटी सुरू होत आहे, आमचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालंय. मला हे सांगताना अभिमान वाटतोय की, ऑलिम्पिक पदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरी या युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू होणार आहेत. आज त्यांच्यासमवेत भेट झाली अन् विस्तृत स्वरुपात चर्चा झाली, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.   दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ही डिजिटल असणार आहे, जगभरात देशाचं नाव उंचावण्याची किमया या विद्यापीठातून होईल, असे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले होते. बाहेरील दिल्ली स्थित मुंडका गावात ही युनिव्हर्सिटी प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच तीची सुरुवात होत आहे. 

कोण आहेत कर्णम मल्लेश्वरी

कर्णम मल्लेश्वरी या वेटलिफ्टींग खेळी संबंधित असून ऑलिंपिकपदक विजेता आहेत. ऑलिंपिक पदत जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू म्हणून त्यांचा गौरव आहे. मल्लेश्वरी यांनी सन 2000 साली सिडनी ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. आजही त्यांचा विक्रम कायम आहे. कारण, अद्याप एकाही भारतीय महिला वेटलिफ्टरने त्यांच्या विक्रमाला गवसणी घातली नाही. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीuniversityविद्यापीठ