शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

गांधी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी स्पेशल सिक्युरिटी ग्रुप तयार; दहशतवादविरोधी कारवायांत सक्रिय होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 06:35 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाने गांधी कुटुंबाला असलेल्या सुरक्षा धोक्याचा सतत आढावा घेतल्यानंतर तो ‘फारच मोठा’ असल्याचे आढळल्यावर सुधारित नियम तयार केले.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : गांधी कुटुंबाच्या सदस्यांचे संरक्षण व सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांनी ‘एसएसजी’ (स्पेशल सिक्युरिटी ग्रुप) या नावाची विशेष शाखा निर्माण केल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसएसजीची निर्मिती पोलीस सह आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याखाली केली गेली असून तो केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) सुरक्षा दल शाखेसोबत समन्वय राखील. एसएसजी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची (एसपीजी) जागा घेईल. एसपीजीने गांधी कुटुंबातील सदस्य आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सुरक्षा पुरवली आहे.

सीआरपीएफच्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या (व्हीआयपी) सुरक्षा शाखेसोबत एसएसजीच्या प्रभारीने अतिशय जवळून समन्वय राखल्यानंतर ही नवी सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात आली आहे. सीआरपीएफ ताबडतोब गांधी कुटुंब आणि प्रियांका वाड्रा आणि त्यांच्या मुलांना सुरक्षा पुरवील आणि दिल्ली पोलीस बाहेरील सुरक्षा कवच देतील. सीआरपीएफचे महा निरीक्षक (गुप्तचर आणि व्हीआयपी सुरक्षा) पी. के. सिंह यांनी फक्त गांधी कुटुंबासाठीच नव्हे तर इतर अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी अतिशय कठोर, असे सुरक्षा नियम बनवले आहेत.

वस्तुस्थिती अशी आहे की, वाहने आणि तांत्रिक उपकरणे इत्यादीसह बºयाच सोयीसुविधा या एसपीजीत होत्या त्या सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा शाखेला दिल्या जात आहेत. सीआरपीएफ गांधी कुटुंबासह देशात ६० पेक्षा जास्त अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा स्थानिक पोलिसांचे साह्य व मदतीसह करीत आहे. झेड प्लस वर्गात १५, झेड वर्गात २१ आणि राहिलेले इतर वर्गवारीत मोडतात.आता एनएसजीचे रुपांतर पूर्णपणे दहशतवादविरोधी कारवायांत केले जात आहे व यापुढे ते देशात कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा कवच पुरवणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जी सुरक्षा उपलब्ध आहे ती गांधी कुटुंबाला दिली गेली आहे.सुधारित नियमकेंद्रीय गृह मंत्रालयाने गांधी कुटुंबाला असलेल्या सुरक्षा धोक्याचा सतत आढावा घेतल्यानंतर तो ‘फारच मोठा’ असल्याचे आढळल्यावर सुधारित नियम तयार केले. गांधी कुटुंबाची सुरक्षा ही अ‍ॅडव्हान्स सिक्युरिटी लिएसन (एएसएल) आणि स्पेशल आर्मर्ड व्हेईकल्ससह (एसएव्ही) कायमच सज्ज असेल.

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शहा