शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

नेत्रचिकित्सक फर्डिनॅन्ड मोनोयेर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गुगलडुडल

By admin | Updated: May 9, 2017 16:38 IST

गुगलनं डुडलच्या माध्यमातून फ्रान्समधील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक फर्डिनँड मोनोयेर यांना त्यांच्या 181 व्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 9 - गुगलनं डुडलच्या माध्यमातून फ्रान्समधील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक फर्डिनॅन्ड मोनोयेर (Ferdinand Monoyer) यांना त्यांच्या 181 व्या वाढदिवसानिमित्त खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलनं विशेष डुडल बनवून मोनोयेर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मोनोयेर व त्यांच्या कार्याबाबतच्या माहितीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आला आहे. 
 
फर्डिनॅन्ड मोनोयेर यांचा जन्म 9 मे 1836 साली झाला होता व 1912 साली वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले होते. डोळ्यांची दृष्टी तपासण्यासाठीच्या युनिट डायओप्टरचे (यंत्र) ते जनक मानले जात. डायओप्टर या यंत्राद्वारे भिंगाच्या सहाय्याने डोळ्यांच्या दृष्टीची शक्ती तपासली जाते. जेव्हा एखादा रुग्ण डोळे तपासणीसाठी डॉक्टरांकडे जातात तेव्हा सुरुवातीला वेगवेगळे शब्द आणि आकार त्या रुग्णाला पाहण्यास सांगितले जाते. त्यानुसार डॉक्टर रुग्णाच्या डोळ्यांच्या दृष्टीची तपासणी केली जाते. या यंत्राला डायओप्टर असे म्हटले जाते. 
 
डोळे तपासणीसंबंधीचा हा चार्ट 100 वर्षांपूर्वी फर्डिनॅन्ड यांनी बनवला होता.  या चार्टला मोनोयेर चार्ट या नावानंही ओळखले जाते.  याच फर्डिनॅन्ड मोनोयेर यांचा 181 वा वाढदिवस गुगल आज (9 मे)डुडलच्या माध्यमातून साजरा करत आहे. गुगलनं आपल्या डुडलमध्ये "ओ" अक्षरांच्या जागी अॅनिमेटेड डोळे दाखवले आहेत. शेजारी मोनोयेर चार्टदेखील दिसत आहे. येथे डायोप्टरनुसार लहान अक्षरापासून ते मोठ्या आकारातील अक्षरांचा अॅनिमेटेड चार्टही येथे दाखवण्यात आला आहे.
 
या डुडलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोनोयेर यांच्यासंबंधीची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 
तुम्ही या चार्टचं योग्यपद्धतीनं निरीक्षण केले तर तुम्हाला तेथे फर्डिनॅन्ड मोनोयेर यांचे नावदेखील दिसेल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुगलनं आजचे डुडल "व्हिजन क्लॅरिटी" संदर्भात बनवले आहे. 
 
 
 
 
जाणून घ्या डोळ्यांसंबंधीच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी 
1. मानवी डोळ्यांचे वजन साधारणतः 28 ग्रॅम व रुंदी 2.5 से.मी. असते.
 
2. मनुष्याच्या जन्मावेळी डोळ्यांची वाढ क्वचित प्रमाणातच होते
 
3. मानवी डोळे फक्त लाल, निळा आणि हिरवा हे तीनच रंग प्रत्यक्ष पाहातात. या रंगांच्या कमीअधिक संवेदनांचे एकत्रिकरण करुन मेंदू अनेक रंग पाहू शकतो.
 
4. मानवी डोळे राखाडी रंगाच्या सुमारे 50,000  छटा पाहू शकतात
 
5. सामान्यातः दर मिनिटाला 12 ते 17 वेळा पापण्यांची उघडझाप होते  
 
6. डोळ्याला झालेली एखादी किरकोळ जखम किंवा ओरखडा बरे होण्यासाठी 48 तास लागतात
 
7. डोळ्याच्या मज्जापटलावर जवळपास 137 नळ्या ( Rod ) आणि शंकूच्या  (Cone) आकाराच्या चेतापेशी असतात. या दोघांच्या कामात थोडासा फरक आहे. शंकूच्या आकाराच्या चेतापेशी वस्तूबद्दल बारीक तपशील टिपतात. तर नळीच्या आकाराच्या पेशी तपशील टिपण्यात कमी पडल्या तरी त्या रात्रीच्या वेळी शंकूपेशींपेक्षा अधिक चांगले काम करतात. शंकूपेशी रंगांची संवेदना ग्रहण करतात. या शंकूपेशींना काही काळ सतत वापरले तर त्या दमतात आणि पुढे त्याच रंगाची संवेदना नीट ग्रहण करू शकत नाहीत. त्यामुळेच प्रतिमेच्या रंगात फरक पडतो. 
 
8. डोळ्यांनां नियंत्रित ठेवणारे स्नायू शरीरातील सर्वाधिक सक्रीय स्नायू असतात
 
9. आपल्या सरळ दिसणार प्रतिमा डोळ्यांना अगदी विरुद्ध म्हणजे उलट स्वरुपात दिसते
 
10. डोळ्यांच्या आतदेखील स्नायू असतात. आपले डोळे वेगवेगळ्या दिशांकडे फिरवण्याचे कार्य हे डोळ्याच्या बाहेरचे  स्नायू करतात