शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

...म्हणून मायावतींनी दाखवली माया; राहुल गांधींसाठी सोडल्या दोन जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 14:48 IST

अमेठी, रायबरेली मतदारसंघात सपा-बसपा उमेदवार देणार नाहीत

लखनऊ: लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टींनं आघाडी केली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्यामायावतींनी एकत्रित पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली. या आघाडीत काँग्रेसला सामील करुन घेतलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपाला आव्हान देण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी समर्थ असल्याचं मायावतींनी म्हटलं. मात्र तरीही या दोन पक्षांनी काँग्रेससाठी दोन जागा सोडल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. यातील 38-38 जागा सपा-बसपा लढवणार आहेत. तर दोन जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. त्यामुळे उपस्थित पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. याबद्दल प्रश्न विचारल्यावर मायावतींनी यामागील भूमिका स्पष्ट केली. 'काँग्रेस आमच्या आघाडीचा भाग नाही. मात्र तरीही रायबरेली आणि अमेठी मतदारसंघ त्यांना सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला. काँग्रेस अध्यक्षांना भाजपानं या ठिकाणी अडकवून ठेऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला,' असं मायावती म्हणाल्या. सपा-बसपा आघाडीत काँग्रेसला स्थान का देण्यात आलं नाही, याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. 'सपा, बसपानं याआधी काँग्रेसशी आघाडी केली आहे. त्यामुळे काँग्रेससोबतच्या आघाडीचा आम्हाला अनुभव आहे. बसपानं काँग्रेससोबत 1996 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी आमच्या पक्षाला मिळणारी मतं काँग्रेसला मिळाली. मात्र काँग्रेसची मतं आमच्या उमेदवारांना मिळाली नाहीत. 2017 मध्ये अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीनं काँग्रेससोबत विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्या आघाडीचा सपाला कोणताही फायदा झाला नाही,' असं मायावतींनी सांगितलं. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीmayawatiमायावतीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९