शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

चिंता वाढली! घसा खवखवणे, प्रायव्हेट पार्टवर सूज अन्...; मंकीपॉक्स रुग्णांमध्ये दिसून आली 'ही' नवी लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:25 IST

Monkeypox New Symptoms : 86 टक्के रुग्णांनी या आजाराचा संपूर्ण शरिरावरच परिणाम झाल्याचे म्हटले आहे. 71 रुग्णांनी त्यांचा प्रायव्हेट पार्ट दुखत असल्याचे, तर 31 लोकांनी प्रायव्हेट पार्टवर सूज असल्याचे म्हटले आहे.

करोना महामारीनंतर आता मंकीपॉक्सने (Monkeypox) जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. यातच, एका अभ्यासात मंकीपॉक्सची नवी लक्षणे दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. यात म्हणण्यात आले आहे, की सध्या मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णांत, अशी लक्षणे दिसत आहेत, जी सर्वसाधारणपणे व्हायरसच्या संसर्गाशी संबंधित नाहीत.

महत्वाचे म्हणजे, हा निष्कर्ष (Conclusion) मे आणि जुलै 2022 दरम्यान लंडनमधील (London) मंकीपॉक्सच्या 197 रुग्णांवर आधारलेला आहे. रुग्णांनी सांगितलेल्या काही सामान्य लक्षणांत प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना आणि सूज येण्याचाही समावेश आहे. हे लक्षण पूर्वीपेक्षा वेगळे आहे. या अभ्यासात सहभागी असलेले सर्व 197 लोक पुरुष होते. यांचे सरासरी वय 38 एवढे होते. यांपैकी 196 जण समलिंगी (Gay), उभयलिंगी अथवा जे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवतात असे आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. 

मंकीपॉक्स रुग्णांत दिसून आली नवी लक्षणे - 86 टक्के रुग्णांनी या आजाराचा संपूर्ण शरिरावरच परिणाम झाल्याचे म्हटले आहे. या आजाराची सर्वात सर्वसामान्य लक्षणे म्हणजे, ताप (62 टक्के), लिम्फ नोड्समध्ये सूज (58 टक्के) आणि स्नायूचे दुखणे (32 टक्के) होय. या अभ्यासत सहभागी असलेल्या 71 रुग्णांनी त्यांचा प्रायव्हेट पार्ट दुखत असल्याचे, 33 जणांनी घसा खवखवत असल्याचे आणि 31 लोकांनी प्रायव्हेट पार्टवर सूज असल्याचे म्हटले आहे. 

याच बरोबर, 27 रुग्णांच्या तोंडात जखमा होत्या. 22 रुग्णांना शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर एकच जखम दिसून आली आहे. तसेच, 9 रुग्णांना टॉन्सिलची सूज आली होती. संशोधकांनी म्हटल्याप्रमाणे, एकच जखम आणि टॉन्सिलची सूज, ही या पूर्वी मंकीपॉक्सची विशिष्ट लक्षणे म्हणून ओळखली जात नव्हती. एवढेच नाही, तर जवळपास एक तृतियांश (36 टक्के) रुग्ण एचआयव्ही संक्रमितही होते आणि 32 टक्के लोकांत लैंगिक संक्रमणही झालेले होते, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडLondonलंडन