शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 20:20 IST

Sopore Encounter: श्रीनगर ग्रेनड हल्ल्याप्रकरणी 3 दहशतवादी साथीदारांना अटक.

Jammu Kashmir Encounter : दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी (08 नोव्हेंबर) सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात दोन दहशतवादी मारले गेले. याशिवाय, श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

सोपोर चकमकीबाबत ब्रिगेडियर दीपक मोहन म्हणाले, "7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी आम्हाला 2 दहशतवादी पाणीपुरा गावात लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि CRPF यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवली. या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे." 

रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी अटकदरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लष्कर-ए-तैयबा (LeT) शी संबंधित तीन दहशतवादी साथीदारांना शुक्रवारी (08 नोव्हेंबर) श्रीनगरमधील ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. रविवारी झालेल्या या हल्ल्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले असून, त्यात 12 नागरिक जखमी झाले होते. काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक व्हीके बिर्डी म्हणाले, "अटक करण्यात आलेल्यांची नावे उसामा यासीन शेख, उमर फैयाज शेख आणि अफनान मन्सूर शेख अशी आहेत. तिघेही शहरातील इखराजपोरा भागातील रहिवासी आहेत. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी मास्टर्सच्या इशाऱ्यावर करण्यात आला होता." 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी