शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

"...यांच्यापासून माझी सुटका कर"; पतीमुळे हैराण झालेल्या पत्नीची अभिनेता सोनू सूदकडे साद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 14:49 IST

सारेच सोनू सूदचं ट्विटवर कौतुक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या सोनू सूदचाच बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे. 

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमधील कामगार आणि गरजूंसाठी मसीहा बनला आहे. लॉकडाऊनच्या काळात सोनू सूद स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी धावून आला. आतापर्यंत शेकडो परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचे काम सोनू सूद करतोय. एवढेच नव्हे तर त्यानं मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील केलीय.

इतकेच नाहीतर केरळमधील एर्नाकुलम येथील एका फॅक्ट्रीमध्ये काम करणाऱ्या जवळपास 177 मुली लॉकडाउनमुळे अडकल्या होत्या. या मुलींची माहिती भूवनेश्वरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं सोनूला दिली. त्यानंतर सोनूनं या मुलींना तेथून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानं सरकारकडून भुवनेश्वर आणि कोच्ची विमानतळ काही वेळासाठी सुरु करण्याची परवानगी घेतली. त्यानंतर सोनूनं बंगळुरुवरुन एक स्पेशल एअरक्राफ्ट मागवून या मुलींना भुवनेश्वरला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं. अशा परिस्थितीत सारेच सोनू सूदचं ट्विटवर कौतुक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या सोनू सूदचाच बोलबाला असल्याचं पाहायला मिळत आहे. 

एका महिलेनं सोनू सूदला केलेल्या एका ट्विटनं सा-यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या हे ट्विट तुफान व्हायरल झालं आहे. एका महिलेनं सोनू सूदला ट्विट करून सांगितलं की, ती आपल्या पतीवर नाराज आहे. पतीमुळे ती हैराण झाली आहे. पतीकडून सुटका करावी यासाठी तिनं चक्क सोनू सूदकडेच मदत मागितली आहे. तिनं लिहिलं की, "लॉकडाऊनमध्ये मी माझ्या पतीसह घरात बंदिस्त आहे.  एकतर तू माझ्या नव-याला कुठेतरी सोड किंवा माझी तरी इथून सुटका कर. मला आता माझ्या पतीबरोबर राहायचं नाही." 

या महिलेच्या ट्विटला सोनू सूदनंही असा काय रिप्लाय दिला आहे की, वाचून तुम्हीही हसून -हसून लोटपोट व्हाल. यावर सोनू सूदनं भन्नाट उत्तर दिलं. त्यानं लिहिलं, "तुमच्यासाठी  एक चांगली योजना आहे. मी तुम्हा दोघांना गोव्यात सोडतो...काय वाटते तुम्हाला ."

टॅग्स :Sonu Soodसोनू सूद