शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

1 रेमडेसीवीर हवंय, Urgent, भज्जीच्या मदतीला 10 मिनिटांतच पोहोचला सोनू सूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 14:01 IST

सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकर्नाटकमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णास या इंजेक्शनची गरज होती. त्याबाबतचे संपूर्ण तपशील भज्जीनं आपल्या ट्विटमध्ये दिला होता.

मुंबई - देशात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दररोज वाढत असून रोज मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत असताना पुन्हा एकाद बालिवूड अभिनेता आणि लॉकडाऊनचा मसिहा सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच तो दिग्गजांच्याही मदतीला धावून जात आहे. नुकतेच टीम इंडियाचा माजी गोलदाज हरभजनसिंगलाही सोनूने मदत केलीय. 

सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर लोकांना मदत करण्यास सुरुवात केली होती. सोनू सूद अजूनही लोकांना सतत मदत करतो आहे. आता कोरोनाला हरवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला आहे. देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा जाणवतो आहे. यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लॉन्ट घेण्याचे ठरविले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूदने फ्रान्स आणि इतर देशांमधून ऑक्सिजन प्लॉन्ट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यासाठी आणतो आहेत. त्यासोबतच तो अनेकांच्या अडचणींना दररोज तोंड देत आहे. 

हरभजन सिंगने आपल्या ट्विटर अकाऊंवरुन, 1 रेमडेसीवीर इंजेक्शनची अर्जंट गरज असल्याचं म्हटलं होतं. भज्जीच्या या ट्विटला 10 ते 12 मिनिटांतच सोनूने रिप्लाय दिला. त्यामध्ये, भज्जी थोड्यात वेळात इंजेक्शन तिथे पोहोचलेलं असेल, असे ट्विट सोनू सूदने केलंय.  कर्नाटकमधील एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णास या इंजेक्शनची गरज होती. त्याबाबतचे संपूर्ण तपशील भज्जीनं आपल्या ट्विटमध्ये दिला होता. त्यानंतर, सोनू सूदने या ट्विटची दखल घेत, तात्काळ इंजेक्शन पुरविण्याची सोय केली आहे. 

सोनू सूदने फ्रान्सहून मागवला ऑक्सिजन प्लान्ट

रिपोर्टनुसार, सोनू सूदकडून पहिल्या ऑक्सिजन प्लॉन्टची ऑर्डर देण्यात आली आहे आणि ते 10-12 दिवसांत फ्रान्समधून भारतात येईल. सोनू सूद पुढे म्हणाला, 'वेळ आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर येईल आणि आम्ही अधिक जीव गमावू नये यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत'. सोशल मीडियावर पुन्हा एकदा सोनू सूदच्या कार्याचे कौतुक होते आहे. 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदHarbhajan Singhहरभजन सिंगcorona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीर