शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया, राहुल गांधी जामीन घेणार नाहीत !

By admin | Updated: December 16, 2015 02:07 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू अधिकारी राजेंद्र कुमार यांच्यावरील छाप्याने मंगळवारी संसद दणाणली. मोदी सरकारने सध्या आत्मघाती गोलची (सेल्फ गोल) मालिकाच

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू अधिकारी राजेंद्र कुमार यांच्यावरील छाप्याने मंगळवारी संसद दणाणली. मोदी सरकारने सध्या आत्मघाती गोलची (सेल्फ गोल) मालिकाच चालविल्याचे मानले जाते. दुसरीकडे नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामीन न मिळवता हा निर्णय कोर्टावर सोपवणार असल्याने मोदी सरकारभोवती आणखी एक वादळ घोंघावत असल्याची चिन्हे आहेत.सीबीआयने जवळजवळ पाच वर्षे जुन्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयावर छापा मारून आणखी एक संधी मिळवून दिल्याने विरोधक आनंदात आहेत. मोदींच्या अखत्यारितीतील सीबीआयने १८ महिने प्रतीक्षा केली. २३ डिसेंबर रोजी संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत आणखी वाट बघता आली असती. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे आणि जीएसटी विधेयक पारित व्हावे यासाठी उत्सुक असलेल्या सरकारचे ‘टायमिंग’ चुकलेच म्हणावे लागेल. भाजपचे नेते काँग्रेसच्या मनधरणीसाठी मागे फिरत असताना अधिवेशनील वादंगात मात्र एक-दुसऱ्या कारणांवरून भरच घालत आहे. पंजाबमध्ये दोन दलित युवकांचे दारू कंत्राटदाराने हातपाय छाटल्याच्या मुद्यावरून सोमवारी संसदेत कामकाज होऊ शकले नाही. राजधानीत थंडीची लाट असताना रेल्वेने ५०० झोपड्या पाडत अनेकांना बेघर केले, हा मुद्दाही विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत देणारा ठरला. उच्च न्यायालयाने दणका दिल्यामुळे केंद्रावर मूग गिळण्याची पाळी आली.या आठवड्यातही संसद ठप्पच राहण्याची शक्यता आहे. नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांना शनिवारी दिल्ली न्यायालयाने हजर राहण्यास बजावले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी हा क्षण ऐतिहासिक बनविण्याची तयारी चालविली आहे. हे दोन्ही नेते जामीन न मिळवता हा निर्णय न्यायाधीशांच्या शहाणपणावर सोपवणार असे संकेत मिळाले आहेत. इंदिरा गांधींच्या कारावासाला उजाळा !१९७८ मध्ये इंदिरा गांधी यांनी जामीन न मिळवता कारागृहात जाणेच पसंत करीत संधीचे सोने केले होते, या आठवणींना धवन यांनी उजाळा दिला असे समजते. सोनिया आणि राहुल गांधी यांचा १० जनपथहून न्यायालयाकडे निघताना तोच मनसुबा राहू शकतो. न्यायाधीशांनी या दोघांना कारागृहात पाठविल्यास तो निर्णय गांधींसाठी लाभदायकच ठरू शकतो. कोणताही जामीन न मिळवता न्यायालयाने त्यांना घरी जाऊ दिल्यास तो सुद्धा त्यांचा राजकीय विजय ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला संपूर्ण आठवडाभर अधिवेशन चालू द्यायचे नाही. २१ डिसेंबरनंतरच संसदेतील वातावरण पूर्ववत होऊ शकेल मात्र सरकारच्या कोणत्या संस्थांनी आणखी आत्मघाती गोलची नोंद केली नाही तरच ते शक्य आहे.