शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींनी मतदारांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 06:49 IST

रायबरेलीचा दौरा; काँग्रेसचा लढा सुरूच राहणार, जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

रायबरेली : उत्तर प्रदेशात भाजपने काँग्रेसचा सणसणीत पराभव केला. पक्षाध्यक्ष राहुल गांधी अमेठीमध्ये पराभूत झाले; पण रायबरेलीतून यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून आल्या. या विजयाबद्दल सोनिया गांधी यांनी बुधवारी रायबरेलीला भेट देऊन मतदारांचे आभार मानले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कन्या व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही होत्या.

रायबरेलीपासून अमेठी जवळ असूनही सोनिया व प्रियांका गांधी या तिथे जाण्याची शक्यता नाही. सोनिया व प्रियांका गांधी यांचे बुधवारी सकाळी विमानाने फुरसतगंज येथे आगमन झाले. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी असलेल्या प्रियांका गांधी यांनी रायबरेली जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. लोकसभा निवडणुकांत रायबरेली जिल्ह्यात काँग्रेसने केलेल्या कामगिरीबद्दल या बैठकीत चर्चा करण्यात आली.रायबरेलीच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी संध्याकाळी आयोजिलेल्या कार्यक्रमाला सुमारे अडीच हजार काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकांत रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी व भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांचा १ लाख ६७ हजार १७८ मतांनी पराभव केला होता.  

पोटनिवडणुकांची तयारी सुरूच्धर्मनिरपेक्षता, तसेच अन्य महत्त्वाच्या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. वेळप्रसंगी त्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.च्प्रियांका गांधी यांच्याकडे काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्या तेथील ३५ मतदारसंघांत फिरून पराभवाविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे समजून घेणार आहेत.च्उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांची त्या तयारी करीत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी