सोनिया गांधींनीच करावे काँग्रेसचे नेतृत्व - शीला दीक्षित

By Admin | Updated: April 14, 2015 20:26 IST2015-04-14T18:09:15+5:302015-04-14T20:26:49+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित करत सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे वक्तव्य काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी केले आहे

Sonia Gandhi should lead Congress - Sheila Dikshit | सोनिया गांधींनीच करावे काँग्रेसचे नेतृत्व - शीला दीक्षित

सोनिया गांधींनीच करावे काँग्रेसचे नेतृत्व - शीला दीक्षित

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वगुणांबाबत प्रश्न उपस्थित करत सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे वक्तव्य काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी केले आहे. तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शीला दीक्षित यांनी एका मुलाखतीदरम्यान राहुल गांधी यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत शंका उपस्थित केली. ' राहुल यांच्या नेतृत्व गुणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, सोनिया गांधी यांनीच पक्षनेतृत्व केले पाहिजे' असे त्या म्हणाल्या. ' सोनिया गांधी कधीच त्यांच्या जबाबादारीपासून पळत नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाधानाची भावना निर्माण होते.  त्यांच्यासमोर आलेल्या आव्हानांचा त्या सामना करतात. त्या शक्तिशाली व यशव्सी नेतृत्व करणा-या असल्यामुळे पुनरुज्जीवनासाठी पक्ष त्यांच्यावर अवलंबून राहू शकतो,' असेही त्यांनी सांगितले. 
गेल्या महिन्याभरापासून रजेवर गेलेले राहुल गांधी हे उद्या परत येण्याची शक्यता आहे. 
 
 
 


Web Title: Sonia Gandhi should lead Congress - Sheila Dikshit