शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सोनिया गांधी-गहलोत २ तास चर्चा; अर्ज करताना शक्तिप्रदर्शन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 06:47 IST

अशोक गहलोत यांनी मंगळवारी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले होते की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचा अखेरचा प्रयत्न मी करणार आहे.

आदेश रावल 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हे आता निश्चित झाले आहे. गहलोत यांनी राजस्थानातील आमदारांना अर्ज दाखल करण्यासाठी आमंत्रित केले आहे. तत्पूर्वी, शुक्रवारी गहलोत हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाणार आहेत. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि गहलोत यांच्यात बुधवारी नवी दिल्लीत दोन तास चर्चा झाली. 

अशोक गहलोत यांनी मंगळवारी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सांगितले होते की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मनधरणी करण्याचा अखेरचा प्रयत्न मी करणार आहे. जर ते तयार झाले नाहीत आणि मला अर्ज दाखल करण्यासाठी निर्देश देण्यात आले तर सर्व आमदारांना २६ सप्टेंबरला दिल्लीत अर्ज दाखल करण्यासाठी यावे लागेल. गहलोत हे बुधवारी रात्री मुंबईकडे रवाना होत आहेत तर, गुरुवारी सकाळी केरळमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी होतील. 

गहलोत हे अर्ज दाखल करण्यापूर्वी शुक्रवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतील. दिल्लीत दाखल झाल्यानंतर गहलोत यांनी बुधवारी सांगितले की, ‘एक व्यक्ती, एक पद’ हा फॉर्म्युला संघटनेतील नियुक्तीशी संबंधित आहे. ही तर निवडणूक आहे. त्यात मुख्यमंत्री असो की, मंत्री अर्ज दाखल करू शकतात. या निवडणुकीचा एक व्यक्ती, एक पदाशी संबंध नाही. उदयपूर येथील चिंतन शिबिरात एक व्यक्ती एक पदाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. गहलोत हे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडू इच्छित नाहीत. मात्र, याबाबतचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना घ्यायचा आहे.

२४ वर्षांनंतर सूत्रे बिगर गांधी व्यक्तीकडे जाणार... काँग्रेसची सूत्रे बिगर गांधी व्यक्तीकडे जाणे आता निश्चित मानले जात आहे. १९९८ मध्ये सीताराम केसरी यांच्या जागी सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या होत्या. त्यानंतर २०१७ मध्ये राहुल गांधी हे अध्यक्ष झाले होते. पण, २०१९ मध्ये त्यांनी पद सोडले होते. २०१९ पासून सोनिया गांधी या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. पण, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिलेला आहे. 

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार नाहीतनवी दिल्ली : काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार, याबाबत चर्चा सुरू असतानाच पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बुधवारी स्पष्ट केले की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवेळी भारत जोडो यात्रेत असणार आहेत. ते दिल्लीत येणार नाहीत. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, राहुल गांधी हे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणार नाहीत. 

काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे बुधवारी सकाळी काँग्रेसच्या मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाच्या संबंधितांशी चर्चा केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हेही काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी सकाळी दाखल झाले. राहुल गांधी हे २३ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रेतून दिल्लीत येतील. जयराम रमेश यांनी सांगितले की, राहुल गांधी हे सोनिया गांधी यांची भेट घेतील. नव्या अध्यक्षपदाबाबत यावेळी त्यांच्यात चर्चा होऊ शकते. सोनिया गांधी यांनी मंगळवारी संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना केरळमधून बोलाविले होते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक