शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यांच्या बिहारमध्ये चर्चेमुळे महाआघाडी राहणार कायम, भाजपविरोधात एकत्र येण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 08:38 IST

RJD-Congress alliance in Bihar :  सोनिया गांधी यांच्या फोननंतर लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा भाजपविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी समविचारी पक्षांची बैठक बोलवावी, असेही यादव यांनी बोलून दाखवले. 

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : बिहारमध्ये काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाची महाआघाडी फुटल्यानंतर सोनिया गांधी यांनी बुधवारी लालुप्रसाद यादव यांना फोन करून, त्यांची नाराजी दूर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व पदाधिकार्यांच्या काल, मंगळवारी झालेल्या बैठकीत बिहारचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी राजदशी कायमस्वरूपी संबंध तोडून टाकण्याची मागणी केली  होती.त्यावेळी सोनिया गांधी काही बोलल्या नाहीत. पण त्यांना स्वत:ला राजदशी असलेली आघाडी तुटणे मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आज थेट लालुप्रसाद यांना फोन करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. भक्त चरण दास गेले काही दिवस बिहारमध्ये सातत्याने राजद व तेजस्वी यादव यांच्याविरोधात बोलत असल्याने लालुप्रसाद नाराज होते. सोनिया गांधी यांच्या फोननंतर यादव यांनी पुन्हा भाजपविरोधात सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सोनिया गांधी समविचारी पक्षांची बैठक बोलवावी, असेही यादव यांनी बोलून दाखवले. एकंदरच यादव व सोनिया गांधी यांच्या संभाषणानंतर बिहारमधील महाआघाडी कायम राहील आणि भक्त चरण दास यांच्याऐवजी अन्य नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले जाईल, अशी चर्चा आहे. मुळात बिहारमधील कन्हैया कुमार यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देणे तेजस्वी यादवना आवडलेले नाही. त्या दोघांत ३६ चा आकडा आहे. त्यातच कुशेश्वरस्थान व तारापूर या दोन्ही पोटनिवडणुकांत उमेदवार उभा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याने महाआघाडीत फूट पडल्यात जमा होती.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार