शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधींचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; ईडीकडे मागितला तीन आठवड्यांचा वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 06:47 IST

Sonia Gandhi: कोरोनामुळे सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi Covid-19 Positive) अजूनही कोरोना संक्रमित आहेत. त्यांचा  कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली. निर्धारित वेळेनंतर पुन्हा एकदा त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल, मात्र तोपर्यंत त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, कोरोनामुळे सोनिया गांधी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी सोनिया गांधी यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशीसाठी मिळालेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या नोटीसवर सोनिया गांधी यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाने यावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. बुधवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसने सांगितले की, सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होतील, कारण त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही. पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले, आम्ही नियमांचे पालन करतो. आमच्या अध्यक्षांना बोलावले तर त्या नक्कीच हजर होतील. आम्हाला कसलीही भीती आणि दहशत नाही, आम्ही भाजपसारखे नाही. 

दुसरीकडे, 13 जून रोजी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणार आहेत. यासंदर्भात पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली असून पक्षाच्या खासदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आपल्या खासदारांना 13 जून रोजी सकाळी दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या ईडीसमोर हजेरी लावण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते, खासदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवून मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर चौकशीसाठी बोलावले आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस