शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठरलं..! राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 21:41 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर राहुल गांधी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार? या प्रश्नावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी  15 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राहुल गांधी अमेठी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत.

काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या 15 उमेदवारांच्या यादीत गुजरातच्या चार आणि उत्तर प्रदेशच्या 11 जागांचा समावेश आहे. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून निवडणूक लढवणार आहेत. 

दरम्यान, रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच काँग्रेसचे गड मानले गेले आहेत. राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या बालेकिल्ल्यातून लढविली होती. मात्र तेथे भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती.

दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी कदाचित लढवणार नाहीत, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 

याचबरोबर, गेल्या काही दिवसांपूर्वी सक्रिय राजकारणात उतरलेल्या प्रियंका गांधी यांचे या पहिल्या यादीत नाव नाही आहे. त्यामुळे प्रियंका गांधी निवडणूक लढणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९