शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

खुद्द सोनियाही नितीन गडकरींच्या कामाचं बाकं वाजवून कौतुक करतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 16:35 IST

नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचा पदभार आहे. त्यानुसार, देशातील दळणवळण सुविधा आणि रस्ते बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा दस्तुरखुद्द सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे. लोकसभेत गडकरींच्या कामाची वाहवा करताना सोनिया यांनी चक्क बाकं वाजवून गडकरींच्या कार्याला दाद दिली. लोकसभेत गडकरींकडे असलेल्या खात्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावरील, उत्तरादरम्यान खासदार सिंग यांच्या 'वंडरफुल्ल' शब्दाचा उल्लेख येताच सोनिया गांधींनी दाद देत गडकरींचे कौतुक केलं. 

नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय दळणवळण मंत्रालयाचा पदभार आहे. त्यानुसार, देशातील दळणवळण सुविधा आणि रस्ते बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे, लोकसभेत रस्ते मंत्रालयाकडून झालेल्या कामासंदर्भात आणि देशात सुरू असलेल्या कामासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना गडकरींना देशातील सर्वच खासदार माझ्या आणि माझ्या मंत्रालयातील कामाबद्दल समाधानी असल्याचे म्हटले. या सर्वच खासदारांच्या मतदारसंघात सध्या रस्तेबांधणीचे कामे सुरू असल्याचेही गडकरींनी सांगितले. त्यावेळी, भाजपा खासदारांनी गडकरींच्या उत्तराने समाधान व्यक्त करत लोकसभेत बेंच वाजवून त्यांना समर्थन दिले. मध्य प्रदेशचे भाजपा खासदार गणेश सिंग यांनीही यावेळी गडकरींच्या कामाचे कौतुक केले. केंद्रीय दळणवळणमंत्री आणि त्यांच्या मंत्रालयाकडून 'वंडरफुल' काम सुरू असल्याचं सिंग यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना म्हटले. त्यावेळी, हे सर्व बारकाईने ऐकणाऱ्या खासदार सोनिया गांधी यांनी हळूवार स्माईल देत बाक वाजवून गडकरींच्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर, काँग्रेस खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनीही सोनिया गांधीचे अनुकरण करत गडकरींच्या कामाचे बाक वाजवून कौतुक केले. 

दरम्यान, सोनिया गांधींनी रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांच्या समस्येबाबत नितीन गडकरींना लक्ष घालण्याचे सूचवले होते. त्यानंतर, रायबरेली मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लावल्याबद्दल नितीन गडकरींना पत्र लिहून सोनिया गांधींनी आभार व्यक्त केले होते. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात हे पत्र सोनिया यांनी लिहिले होते.    

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीNitin Gadkariनितीन गडकरीlok sabhaलोकसभाMember of parliamentखासदार