शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक मनू सिंघवींच्या सावरकरांवरील 'त्या' ट्विटमुळे सोनिया गांधी संतप्त, मागायला लावली माफी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 17:54 IST

स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे.

नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी यांना चांगलेच महागात पडले आहे. सोमवारी महाराष्ट्र आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच अभिषेक मनू सिंघवी यांनी सावरकरांची प्रशंसा करणारे ट्विट केले होते. मात्र या ट्विटमधील आशयामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी कमालीच्या संतप्त झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकरवी सिंघवी यांना संदेश पाठवून फोन करण्यास सांगितले. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण मागवून दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले.  सोमवारी अभिषेक मनू सिंघवी यांनी एक ट्विट करून सावरकर यांची प्रशंसा केली. ''मी वैयक्तिकरीत्या सावरकरांच्या विचारसणीचे समर्थन करत नाही. मात्र सावरकर हे एक परिपूर्ण व्यक्ती होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. दलितांना अधिकार मिळवून देण्यासाठी लढाई लढली आणि देशासाठी तुरुंगवासही भोगला. हेही नाकारत नाही.'' असे सिंघवी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

 दरम्यान, अभिषेक मनू सिंघवी यांच्या ट्विटमुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली. स्पष्टीकरण देण्यासाठी सिंघवींवर दबाव वाढवण्यात आला. त्यामुळे अखेरीस सिंघवी यांना प्रसारमाध्यमांवर येऊन माफी मागावी लागली. सिंघवी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सिंघवी यांना फोन केला. हा फोन काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचा दावा, इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने केला होता.   दरम्यान, सिंघवी यांनी सोमवारी अजून एक ट्विट केले होते. त्यातून त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ''सर्वसमावेशकता ही भारताच्या विचारसरणीची शक्ती आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक प्रवाह राहिले आहेत. मात्र सावरकरांच्या राष्ट्रवादामध्ये अपेक्षित असलेला युद्धोन्माद आणि हिंसक विचारांशी कुणीही सहमत होऊ शकत नाहीत. तसेच त्यांच्या गांधीविरोधी विचारांशीही कुणी सहमत होऊ शकत नाही. मात्र ते राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित झालेले होते, असे आपण म्हणू  शकतो.'' 

टॅग्स :congressकाँग्रेसVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर