शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल; 2 जून रोजी झाली होती कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 15:54 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली.

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी कोविडच्या त्रासामुळे गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2 जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. यानंतर त्यांनी स्वतःला विलगीकरणात टाकले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रणदीप सुरजेवाला यांनी माहिती दिलीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व हितचिंतकांचे काळजी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तिकडे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना केली आहे.

ED चा सोनिया आणि राहुल यांना समन्सनॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने(ED) सोनिया गांधी यांना 23 जून रोजी समन्स बजावले आहे. यापूर्वी ईडीने 8 जून रोजी समन्स बजावले होते, मात्र कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. आता त्या 23 जूनला ईडीसमोर हजर होणार आहेत.

याच प्रकरणी ईडीने राहुल गांधींना 13 जून रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. राहुल गांधी यापूर्वी 2 जून रोजी एजन्सीद्वारे हजर होणार होते, परंतु राहुल गांधी देशाबाहेर होते. यानंतर एजन्सीने त्यांना 13 जून रोजी मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. राहुल गांधी यांच्या चौकशीपूर्वी सर्व खासदार आणि वरिष्ठ नेत्यांना पक्ष मुख्यालयात पोहोचण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे. 13 जून रोजी हे सर्वजण राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयाकडे मोर्चा काढणार आहेत.

2012 मध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरण चर्चेत आले होते2012 मध्ये नॅशनल हेराल्डचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की, काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड, यंग इंडियन लिमिटेडमार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची 2000 कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्या