शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

सोनिया व राहुलमुळेच झाले नाही कामकाज, संसदीय मंत्र्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:32 AM

संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली - संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यात गुरुवारी लोकसभेत झालेल्या शाब्दिक वादाने सभागृहातील वातावरण तापले होते. अनंत कुमार यांनी राहुल व सोनिया गांधी यांनीच कामकाज चालू दिले नाही, असा आरोप करताच सोनिया यांनी आक्षेप घेतला.त्यांनी सभागृहाबाहेर अनंत कुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला. सामान्यत: शांत राहणाऱ्या सोनिया गांधी यांनी संसदीय कामकाज मंत्री सभागृहात खोटे बोलू शकतात हे लाजिरवाणे आहे, अशा शब्दांत राग व्यक्त केला. त्या म्हणाल्या, काँग्रेसचे सदस्य आपल्या जागेवर उभे राहून सभागृहात चर्चेची मागणी करीत होते. सरकार आणि त्याचे मित्र पक्ष कामकाज चालू देत नाहीत.सोनिया गांधी व अनंत कुमार यांच्यात चकमक सुरू असताना काँग्रेसचे सदस्य संतापून उभे ठाकले. वातावरण बिघडल्याचे पाहून सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची नावे कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश दिले.भाजपाशी लढण्यासाठी काँग्रेसविरोध सोडणे गरजेचे - पवारनवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीशी लढण्यासाठी काँग्रेसविरोध सोडून देणे अत्यावश्यक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आज कमकुवत असला तरी देशाला त्याची गरज आहे. त्याला टाळता येणार नाही. इतर राजकीय पक्षांना देशात ओळख नाही. ती काँग्रेसला आहे, असे पवार म्हणाले.प्रादेशिक पक्षांच्या शक्तीची जाणीव काँग्रेसनेही ठेवावी आणि त्यांच्याशी बोलणी करताना व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा, असे पवारांना वाटत आहे. काँग्रेसच्या सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीबद्दल विचारले असता पवार म्हणाले की, समाजवादी पक्ष (सप), बहुजन समाज पक्ष (बसप), तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) या पक्षांशी सधन शेतकºयाकडील जमीन गेल्यानंतर जसे उद्धटपणे वागतात, तसे नव्हे, तर त्याच्याकडेही एके काळी जी शेती होती, याची आठवण ठेवून वागावे.उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस स्वत:ची जागा निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्षाच्या संयुक्त उमेदवारांविरुद्ध आपला उमेदवार उभा केला होता.पवार यांनी मध्यंतरी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी व तेलगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा केली होती. सर्वांनी एकत्र येण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून योजना कळवतो, असे त्यांनी राहुल गांधी यांना सांगितले होते.

टॅग्स :ParliamentसंसदSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीGovernmentसरकार