शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनभद्र’ची कोंडी फुटली; आदिवासी कुटुंबियांशी प्रियांका गांधींची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 02:31 IST

उत्तर प्रदेशातील हत्याकांड। मृत कुटुंबियांनी मिर्झापूरच्या विश्रामगृहावर घेतली प्रियांका गांधी यांची भेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून झालेल्या आदिवासी हत्याकांडातील मृतांच्या कुटुंबियांनी शनिवारी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार येथील विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यातील संघर्ष मिटला.

सोनभद्र येथे बुधवारी एका गावाच्या सरपंचाने १0 गोंड आदिवासींची गोळ््या घालून हत्या केली होती. मृत आदिवासींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी प्रियांका गांधी या काल उत्त्तर प्रदेशात आल्या होत्या. तथापि, पोलिसांनी त्यांना सोनभद्रला जाण्यापासून रोखले होते. त्यांना ताब्यात घेऊन विश्रामगृहावर आणण्यात आले होते. सुटका करून घेण्यासाठी वैयक्तिक जात मुचलका सादर करण्याची सूचना पोलिस प्रशासनाने प्रियांका गांधी यांना केली होती. तथापि, प्रियांका गांधी यांनी वैयक्तिक जात मुचलका देण्यास नकार देऊन आपण तुरुंगात जाण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठाच पेचप्रसंग निर्माण झाला होता. प्रियांका गांधी या रात्रभर विश्रामगृहावरच मुक्कामी थांबल्या. त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली.

ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय राय यांनी सांगितले की, आज सकाळी मृत आदिवासींच्या परिवारातील १५ सदस्यांनी प्रियांका गांधी यांची विश्रामगृहावर येऊन भेट घेतली. त्यात सात महिलांचा समावेश होता. त्यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधी यांची विनाअट सुटका केली. त्या वाराणसी मार्गे नवी दिल्लीला परतल्या.

आदिवासींची भेट घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले की, ज्यांनी मला अटक करून चुनार विश्रामगृहावर आणले होते, ते आता म्हणत आहेत की, तुम्ही कोठेही जाण्यास मुक्त आहात! मी त्यांना सांगू इच्छिते की, सोनभद्र हत्याकांडातील पीडित आदिवासी परिवारांची भेट घेण्यासाठी मी आले होते. माझा हेतू सफल झाला आहे. मी आता जात आहे; पण मी परत येईन. दरम्यान, प्रियांका गांधी यांनी काल रात्री उशिरा एक टष्ट्वीट करून ‘प्रशासनाने आपणास पुढे जाऊ न दिल्यास आपण तुरुंगात जाण्यास तयार आहोत’, असे म्हटले होते. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळासही पोलिसांनी वाराणसी विमानतळावर ताब्यात घेतले.

काय आहे घटना?सोनभद्रच्या घोरवाल भागातील उभ्भा गावात हे हत्याकांड घडले आहे. गावचा सरपंच यज्ञ दत्त याने ट्रॅक्टरमध्ये गुंड आणून वादग्रस्त जमीन कसणाऱ्या आदिवासींवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात १0 आदिवासी ठार, तर २८ जण जखमी झाले होते. जखमींत दत्त याच्या ९ समर्थकांचाही समावेश आहे.

आदिवासींचे अश्रू पुसलेभेटायला आलेल्या आदिवासींच्या परिवारांतील सदस्यांचे प्रियांका गांधी यांनी सांत्वन केले. त्यांचे अश्रू पुसले. त्यांना पाणीही दिले. काही पीडित परिवारातील सदस्यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबत फोटो काढून या भेटीच्या स्मृती कायमस्वरूपी जतन केल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेश