शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:36 IST

Sonam Arrested : राजा रघुवंशीच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले. जिच्यासोबत राजा हनिमूनला गेला होता, त्या सोनमनेच त्याचा काटा काढल्याचे समोर आले. यात तीन तरुणांनी तिची मदत केली. 

Raja Raghuvanshi Sonam News: हनिमूनला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम यांच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले. राजा रघुवंशीची हत्या सोनमनेच केल्याचे पोलीस तपासातून समोर आले. पोलिसांनी सोनमसह तिघांना अटक केली आहे. तर, एक फरार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

२८ दिवसांपूर्वी ज्याच्यासोबत सात फेरे घेतले आणि ज्याच्या नावाचे कुंकू लावले. त्यालाच अवघ्या काही दिवसांत संपवले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात झालेल्या नव्या खुलाशाने सगळीकडे खळबळ उडाली आहे. 

वाचा >>हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक

सोनम २० मे रोजी राजा रघुवंशीसोबत हनिमूनसाठी इंदौरवरून गेली होती. मेघालयात फिरत असताना २३ मे रोजी अचानक बेपत्ता झाले. त्यानंतर २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला आणि प्रकरणातील गुढ वाढले. पण, या सगळ्यामागे सोनमचं मुख्य सूत्रधार निघाली. 

राजाची हत्या करून सोनम झाली होती फरार

शिलाँगमध्ये फिरत असताना सोनम राजाला निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेली. त्यावेळी तिच्यासोबत तीन जण होते. तिथे राजाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आणि मृतदेह दरीत टाकण्यात आला. हत्येच्या प्रकरणात आपल्यावर संशय येऊ नये म्हणून सोनमने तिच्या अंगावरील पांढरा शर्ट आणि पर्सही मृतदेहाशेजारीच टाकली होती. २३ मे रोजी राजाची हत्या केल्यापासून ती फरार होती. 

पैसे देऊन बोलावले हत्यारे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने राजाची हत्या करण्यासाठी पैसे दिले होते. तीन जणांना पैसे देऊन शिलाँगमध्ये नेले होते. त्यांच्या मदतीनेच तिने राजाची हत्या केली. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे सोनमला अटक केली. त्याचबरोबर या हत्या प्रकरणात सहभाग असलेल्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एक जण फरार आहे.  राजा रघुवंशी आणि सोनमचे ११ मे रोजी इंदौरमध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर नऊ दिवसांनी म्हणजे २० मे रोजी ते मेघालयात पोहोचले. २३ मे रोजी ते शिलाँगमधील नोंग्रियाट गावातील डबल डेकर लिव्हिंग रुट पूल बघण्यासाठी गेले होते. त्यानंतर बेपत्ता झाले. २४ मे रोजी त्यांनी फिरण्यासाठी भाड्याने घेतलेली स्कूटर पोलिसांना सापडली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस