शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:53 IST

Sonam Raghuvanshi Case : सध्या सोनम रघुवंशी पोलीस कोठडीत असून, तिच्या कबुलीने हत्येच्या प्रकरणात नवे वळण आले आहे.

मेघालयात घडलेल्या राजा रघुवंशी हत्येचा उलगडा करत पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तपासातून हे समोर आले आहे की, राजा रघुवंशीच्या हत्येचा कट कुण्या बाहेरील व्यक्तीने नव्हे, तर त्याच्या पत्नी सोनम रघुवंशीनेच रचला होता. या कटामध्ये तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याचे साथीदार सामील होते. सध्या सोनम रघुवंशी पोलीस कोठडीत असून, तिच्या कबुलीने हत्येच्या प्रकरणात नवे वळण आले आहे.

बेपत्ता जोडपं आणि एक संशयास्पद मृत्यू२३ मे रोजी सोनम आणि राजा दोघेही खासी हिल्स परिसरातून अचानक बेपत्ता झाले. या घटनेनंतर अनेक दिवस दोघांचाही काही पत्ता लागत नव्हता. मात्र, २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खोल खड्ड्यात आढळून आला आणि प्रकरण गंभीर बनलं. सोनम अद्याप गायबच होती, ज्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई तिच्यावर वळू लागली.

तपासाला मिळालं महत्त्वाचं वळणमेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना, नोंगरियाट गावातील एका स्थानिक गाईड अल्बर्ट पीडी याची माहिती घेतली. त्याने उघड केलं की, सोनम आणि राजा या भागात आले होते आणि त्यांच्यासोबत तीन अनोळखी तरुण देखील होते. हे तिघे हिंदी बोलत असल्यामुळे पोलिसांचा संशय दाटला, कारण स्थानिक लोक प्रामुख्याने खासी भाषा किंवा इंग्रजी वापरतात.

हत्येसाठी बाहेरील लोकांचा सहभागपोलिसांना घटनास्थळी सापडलेला चाकू देखील संशयास्पद होता. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचे शस्त्र स्थानिक परिसरात वापरले जात नाही. त्यामुळे हल्लेखोर हे मेघालयाबाहेरचे असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. पुढील तपासादरम्यान सोनमचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता, तिने हत्येच्या काही दिवस आधी एका आरोपीशी नियमित संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.

सोनमचे आत्मसमर्पणसर्व आरोपींना हळूहळू अटक करण्यात आल्यानंतर, शेवटी सोनमनेही आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतः आपल्या कुटुंबाला फोन करून आपले ठिकाण सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तिला गाझीपूरमधील काशी नावाच्या एका ढाब्यातून ताब्यात घेतलं.

पुढील तपास सुरूसोनम सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्याकडून आणखी माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या इतर आरोपींची सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या मते, ही हत्या पूर्णपणे नियोजनबद्ध होती आणि त्यामागे व्यक्तिगत संबंध व सूडभावना होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार