शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:00 IST

इंदोरच्या राजा सूर्यवंशी हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी सोनमला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे.

Indore Couple Missing Case: इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील ३ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर पत्नी सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. मेघालयातील शिलाँग येथे १७ दिवसांपूर्वी हनिमूनसाठी गेल्यानंतर बेपत्ता झालेली सोनम रघुवंशी अखेर उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील एका ढाब्यावर सापडली. सोनमने तिच्या कुटुंबाशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर कुटुंबियांनी इंदौर पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर इंदौर पोलिसांनी गाझीपूर पोलिसांना कळवलं आणि सोनमला ताब्यात घेण्यात आलं.

मेघालयातील शिलाँग येथे हनिमूनसाठी गेलेल्या  राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ अखेर उकलले आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती आणि त्यांचा मृतदेह डोंगरावर आढळला होता. तर सोनम बेपत्ता झाली होती. सोनमला  आता पोलिसांनी गाझीपूर येथून अटक केली आहे. गाझीपूरचे अतिरिक्त एसपी ज्ञानेंद्र प्रसाद यांनी याला दुजोरा दिला. मेघालय पोलिसांनी राजाच्या हत्येमध्ये त्याच्या पत्नीचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती दिली.

१७ दिवसांच्या सस्पेन्सनंतर, इंदौरच्या राजा आणि सोनमच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मेघालयात हत्या झालेल्या राजाच्या पत्नीला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे. मेघालयचे डीजीपी आय नोंगरांग यांनी दिलेल्या माहितीनुसार सोनम रघुवंशी या हत्येत सहभागी होती आणि तिने मध्य प्रदेशातील तीन मारेकऱ्यांना सुपारी दिली होती.

मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनीही एक्स पोस्टवरुन या प्रकरणाची माहिती दिली आहे. "मेघालय पोलिसांनी राजा हत्याकांडात ७ दिवसांत मोठी कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशातील ३ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, एका महिलेने आत्मसमर्पण केले आहे आणि दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्यासाठी मोहीम अजूनही सुरू आहे," असं मुख्यमंत्री कॉनराड संगमा म्हणाले.

गाझीपुरला कशी सापडली सोनम?

१७ दिवसांनंतर सोनम गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. सोनमने ढाब्यावरून तिच्या कुटुंबाला फोन करून तिचे ठिकाण सांगितले. कुटुंबाने ताबडतोब  पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर गाझीपूर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतले. ती शिलाँगहून गाझीपूर कशी पोहोचली आणि या १७ दिवसांत तिच्यासोबत काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलीस सध्या तिची चौकशी करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा सोनम थकली होती आणि अस्वस्थ अवस्थेत दिसत होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस