शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 14:58 IST

Raja Raghuvanshi : राजा आणि सोनम रघुवंशी प्रकरणातील सस्पेन्स दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान राजाचा मृतदेह सापडला. मात्र सोनमचा अजूनही कोणताही पत्ता लागलेला नाही.

राजा आणि सोनम रघुवंशी प्रकरणातील सस्पेन्स दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान राजाचा मृतदेह सापडला. मात्र सोनमचा अजूनही कोणताही पत्ता लागलेला नाही. सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे की, त्यांचा मुलगा गोविंदला शिलाँगमध्ये धमक्या दिल्या जात आहेत. स्थानिक प्रशासन सहकार्य करत नाही. आम्ही त्याच्या सुरक्षेसाठी येथून लोक पाठवले आहेत. तसेच राजा आणि सोनमचा तिथल्या कॅफे ऑपरेटरशी वाद झाल्याचाही कुटुंबाला संशय आहे.

राजा रघुवंशीची स्कूटी सोहरीममध्ये सापडली होती. जवळच एक कॅफे होता. कॅफेजवळ ही स्कूटी सापडली होती. यानंतर २ जून रोजी वेइसावडोंगमधील धबधब्याजवळ एका खोल दरीत राजाचा मृतदेह आढळला. तिथे जाताना राजा आणि सोनमचं आईशी बोलणं झालं होतं. सोनम आणि राजाचं येथील कॅफे ऑपरेटरशी भांडण झालं असावं असा कुटुंबाचा संशय आहे. या घटनेपासून कॅफे मालकही बेपत्ता आहे. मात्र पोलिसांनी कुटुंबीयांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

नवा ट्विस्ट! राजा-सोनम हनिमूनसाठी शिलाँगला जाणारच नव्हते, अचानक का बदलला प्लॅन?

"बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद

सोनम रघुवंशी शेवटचं तिच्या सासूशी बोलली. संभाषणादरम्यान तिने सांगितलं की, ती धबधब्यावर जात आहे. सोनमचा भाऊ गोविंद रघुवंशी अजूनही बहिणीच्या शोधात शिलाँगमध्ये आहे. वडिलांनी सांगितलं की, १५-१६ दिवस उलटून गेले आहेत पण मुलीचा कोणताही पत्ता लागलेला नाही. कुटुंबाने पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. 

"माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी

मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता

कुटुंबाचा दावा आहे की, राजा त्याचा भाऊ विपिनच्या स्वप्नात आला होता आणि त्याची हत्या झाल्याचं सांगितलं. कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. इंदूरमध्ये राजाच्या कुटुंबाने घराबाहेर बॅनर लावले आहेत. ज्यावर "राजाचा आत्मा म्हणत आहे - मी मेलेलो नाही, मला मारण्यात आलं आहे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे" असं म्हटलं आहे. तसेच "राजा माझ्या स्वप्नात आला आणि म्हणाला की, माझी हत्या झाली आहे. आम्हाला सीबीआय चौकशी हवी आहे" असं विपिनने देखील म्हटलं आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस