नाशिक : पायी जाणार्या महिलेचे समोरून येणार्या दोघा दुचाकीस्वारांनी सोन्याचे मंगळसूत्र व चेन ओरबाडून नेल्याची घटना रविवारी सकाळी घडली़ रविवारी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास जयश्री मधुकर दाते (वृंदावन कॉलनी, अमृतधाम) या भावजयी अनया अशोक फडके यांच्यासमवेत अमृतधाम वाचनालयासमोरील सर्व्हिसरोडवरून पायी जात होत्या़ त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांपैकी पाठीमागे बसलेल्याने दाते यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व चेन ओरबाडून नेली.या प्रकरणी दाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
पायी जाणार्या महिलेची सोनसाखळी ओरबाडली
By admin | Updated: January 6, 2015 00:49 IST