शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 20 वर्षानंतर घेतला वडिलांच्या मृत्यूचा सूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 14:59 IST

राजकुमार यांचा आरोपी दिपक कुमार याच्या वडिलांच्या हत्येत सहभाग होता

गुरुग्राम, दि. 26 - सेक्टर 69 मध्ये राहणा-या एका प्रॉपर्टी डिलरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे तब्बल 20 वर्षांपुर्वी दोन कुटुंबात झालेल्या भांडणातून ही हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकुमार असं हत्या झालेल्या पीडित व्यक्तीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमार यांचा आरोपी दिपक कुमार याच्या वडिलांच्या हत्येत सहभाग होता. 20 वर्षांपुर्वी ही हत्या झाली होती. 

पोलिसांनी दिपकविरोधात मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद केला आहे. राजकुमार रात्री 11 वाजता सोहना रोड येथील आपल्या कार्यालयामधून घरी जात असताना चार ते पाच जणांनी त्यांचा पाठलाग केला. गाडी अडवून गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. जवळपास आठ गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या. छाती, डोकं आणि पायावर गोळ्या झाडण्यात आल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बादशहापूर येथे इस्कॉन टेम्पलजवळ राजकुमार यांच्या गाडीचा एका गाडीने पाठलाग सुरु केला होता. आपल्या गाडीचा पाठलाग होत असल्याचं राजकुमार यांनी कदाचित ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी गाडी वेगाने चालवण्यास सुरुवात केली. मात्र त्यांची गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली. यानंतर आरोपींनी फायरिंग करण्यास सुरुवात केली. यानंतरही राजकुमार गाडीतून निघून सुरक्षितपणे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. जवळच्या एका घरात जाऊन ते लपले मात्र आरोपींनी त्यांचा शोध घेतला आणि गोळ्या घालून हत्या केली'. 

राजकुमार यांच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्याच गावात राहणा-या दिपकविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आरोपींनी वापरलेली कार जप्त केली आहे, मात्र आरोपी अद्यापही फरार आहेत. 

'राजकुमार यांच्या वडिलांनी आठ जणांची नावं दिली असून आम्ही त्यांची तपासणी करत आहोत', अशी माहिती पोलीस अधिकारी राजेंद्र कुमार यांनी दिली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं तयार केली आहेत. 

राजकुमार यांना दिपकचे वडिल ब्रम्हप्रकाश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तीन महिने कारागृहात घालवल्यानंतर न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. दोन्ही कुटुंबांनी तडजोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुटका करण्यात आली होती.