शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोमोज मागितले म्हणून वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2018 15:07 IST

दारू प्यायलेल्या वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकलं.

नवी दिल्ली- मुलाने मोमोज मागितले म्हणून दारू प्यायलेल्या वडिलांनी सहा वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. वडिलांनी मुलाला जैतपूर शेजारी असलेल्या आगरा कालव्यात फेकलं. संजय अल्वी (वय 31) असं आरोपी वडिलांचं नाव आहे. संजयचा मुलगा अयानचा रविवारी मृतदेह सापडला. रविवारी सकाळी 10.10 वाजता ही घटना उघडकीस आली. एक व्यक्ती मुलाला कालव्यात फेकून गेल्याचा फोन पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्वीला पकडलं. व अयानसाठी शोधमोहीम सुरू केली. चौकशीदरम्यान अल्वीने पोलिसांना सांगितलं की, मी व माझा मुलगा फिरत होतो. त्यावेळी अयान भूक लागली म्हणून रडायला लागला. तेव्हाच त्याला बाजूला असलेला मोमोजचा स्टॉल दिसला. अयानने मोमोजसाठी हट्ट केला. अल्वीने अयानला ओरडून गप्प करण्याचा प्रयत्न केला. पण तो गप्प झाला नाही. त्यामुळे चिडलेल्या अल्वीने अयानला पुलावरून खाली फेकलं.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कालव्याजवळ पोहचण्याआधी दारूची बाटली विकल घेतली होती व तो मुलासमोर दारू प्यायला. अल्वीच्या रक्तामध्येसुद्धा दारूचा मोठ्या प्रमाणात अंश सापडला आहे. मृत्यू झालेला मुलगा अयान हे अल्वीचं तिसरं अपत्य आहे. त्याला एक 11 वर्षांची मुलगी आहे तर 10 वर्षांचा मुलगा आहे. अल्वीचं 2004 साली लग्न झालं पण त्याची पत्नी त्याला 2012मध्ये सोडून निघून गेली. अल्वी त्याची आई व तीन मुलांबरोबर राहत होता.