शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा गरजेची, रा. स्व. संघाचे नेते भय्याजी जोशी यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:26 IST

Bhaiyaji Joshi News: अहिंसा या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा आवश्यक असते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी गुरुवारी सांगितले.

अहमदाबाद -अहिंसा या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा आवश्यक असते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी गुरुवारी सांगितले. अहमदाबाद येथे गुजरात विद्यापीठाच्या मैदानावर आयोजिलेल्या हिंदू आध्यात्मिक परंपरा आणि सेवा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले. भारताने शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन जायला हवे, असेही ते म्हणाले.

जोशी म्हणाले की, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदू सदैव तत्पर असतात. त्यासाठी हिंदूंना अशा काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याला दुसरे लोक अधर्म म्हणतील. आपल्या पूर्वजांनी धर्मरक्षणाचे काम उत्तम प्रकारे केले आहे. पांडवांनी अधर्माचा नाश करण्यासाठी काही नियम, संकेत बाजूला ठेवले. त्याची उदाहरणे महाभारतातील लढाईत दिसून येतात. हिंदू धर्मात अहिंसेला महत्त्व आहे. मात्र अहिंसेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसेचा वापर करावा लागतो. अन्यथा अहिंसा ही संकल्पना टिकू शकणार नाही. नेमका हाच संदेश पूर्वजांनी दिला आहे. जो सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करतो, तोच शांतता प्रस्थापित करू शकतो. (वृत्तसंस्था)

बलवान भारत व बलवान हिंदू हे जगासाठी उपकारक ते म्हणाले की, एखादा धर्म दुसऱ्यांच्या श्रद्धांवर गदा आणू पाहात असेल तर त्यावेळी शांतता नांदणार नाही. भारताने वसुधैव कुटुम्बकम हा विचार जगाला दिला आहे. सर्व देशांना सोबत घेऊन वाटचाल करणे हे काम भारताशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही.बलवान भारत व बलवान हिंदू समाज हे जगासाठी उपकारक आहेत. भारत दुर्बल, शोषित व्यक्तींचे रक्षण करण्यास समर्थ आहे. काही धार्मिक संस्थाच नि:स्वार्थ सेवा करतात असा एक गैरसमज आहे. मात्र आपली मंदिरे, गुरुद्वारांमध्ये दररोज एक कोटी लोकांना मोफत जेवण दिले जाते. हिंदूंच्या संस्थांचे काम केवळ धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते शाळा, गुरुकुल, रुग्णालयेही चालवितात, असेही जोशी यांनी सांगितले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndiaभारत