शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कधी-कधी हिंसा आवश्यक असते, हिंदू आपल्या धर्माच्या रक्षणासाठी कटीबद्ध - भैयाजी जोशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:22 IST

भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे...

अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी कधीकधी हिंसाही आवश्यक असते. याच बरोबर, भारतीय नागरिकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी म्हटेल आहे. ते गुरुवारी गुजरात विद्यापीठाच्या मैदानात आयोजित हिंदू आध्यात्मिक सेवा मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.  

भैय्याजी जोशी म्हणाले, "हिंदू नेहमीच आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याला अशा गोष्टीही कराव्या लागतील ज्या इतरांना अधर्म वाटतील. आपल्या पूर्वजांनीही असे केले आहे.

महाभारताच्या युद्धाचा उल्लेख करत ते म्हणाले, पांडवांनीही धर्माचे रक्षण करण्यासाठी युद्धाच्या नियमांकडे उल्लंघन केले. हिंदू धर्मात अहिंसेचे तत्व उपजतच आहे, हे नाकारता येत नाही. मात्र, कधीकधी आपल्याला अहिंसेच्या विचाराचे रक्षण करण्यासाठी हिंसाचाराचाही अवलंब करावा लागतो. अन्यथा अहिंसेचा विचार कधीही सुरक्षित राहणार नाही. आपल्या महान पूर्वजांनी आपल्याला हा संदेश दिला आहे.

"भारतीय लोकांना शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. जे सर्वांना सोबत घेऊन चालण्यात सक्षम आहेत, तेच शांतता प्रस्थापित करू शकता. जर एखादा धर्म दुसऱ्याला आपापल्या धर्माचे पालन करण्याची परवानगी देत नसेल तर, शांतता प्रस्थापित होणार नाही. भारताशिवाय असा कुठलाही देश नाही, जो सर्वांना सोबत घेऊन चालण्यास सक्षम आहे. 'वसुधैव कुटुंबकम' (विश्व एक कुटुंब आहे.) हा आमपाला विचार आहे. जर आपण संपूर्ण विश्वाला कुटुंब मानले, तर कुठलाही संघर्ष होणार नाही," असेही भैय्याजी जोशी यावेळी म्हणाले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू