शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

काही जणांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू- नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 10:54 IST

शिकागोमध्ये विश्व हिंदू काँग्रेसचं आयोजन

शिकागो: सध्या काहीजणांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते अमेरिकेतील शिकागोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू काँग्रेसला संबोधित करत होते. हिंदू धर्मातील खऱ्या मूल्यांच्या संरक्षणाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं विश्व हिंदू काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं आहे. भारताचा सार्वभौम सहनशीलतेवर विश्वास असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी म्हटलं. सर्व गोष्टी एकमेकांशी वाटून घेणं आणि एकमेकांची काळजी घेणं ही हिंदू धर्माची मूळ तत्त्वं असल्याचं ते म्हणाले. सध्या हिंदू धर्माबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'सध्या काही लोकांकडून हिंदू शब्दाला अस्पृश्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांनी त्यांचे विचार योग्यपणे मांडायला हवेत. त्यामुळे प्रामाणिक दृष्टीकोन जगासमोर येईल,' असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं. व्यंकय्या नायडू यांच्या आधी सरसंघचालक मोहन भागवत यांनी विश्व हिंदू काँग्रेसला संबोधित केलं. हिंदू कोणालाही विरोध करण्यासाठी जगत नाहीत. मात्र हिंदूंना विरोध करणारे काही लोक असू शकतात, असं भागवत यांनी म्हटलं होतं. हिंदू समुदायानं एकजूट होऊन मानवाच्या कल्याणासाठी काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं.  

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूHinduहिंदूRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ