शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

गावातील पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी त्याने 27 वर्ष जमीन खोदून तयार केला तलाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2017 13:43 IST

छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला.

ठळक मुद्दे छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला. सजा पहाड गावातील श्याम लाल हे 15 वर्षांचे असताना त्यांनी जमीन खोदून तलाव तयार करण्याचं आव्हान त्यांच्या खांद्यावर घेतलं.

छत्तीसगड, दि.1- गावात असलेल्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराची अनेक उदाहरणं आपण पाहतो. गावात पाण्याची चणचण जाणवू नये यासाठी विविध उपक्रमही राबविले जातात. असंच एक उदाहरण छत्तीसगडमध्ये पाहायला मिळतं आहे. छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला. सजा पहाड गावातील श्याम लाल हे 15 वर्षांचे असताना त्यांनी जमीन खोदून तलाव तयार करण्याचं आव्हान त्यांच्या खांद्यावर घेतलं. गावातील लोकांच्या मते श्याम लाल यांना जमीन खोदून तलाव तयार करायला एकुण 27 वर्ष लागली.

छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातील त्या गावात काही वर्षांपूर्वी पाण्याची खूप चणचण होती. गावातील लोकांसमोर त्यांच्याकडे असलेल्या गायींची तहान भागविण्याचा प्रश्न होता. त्यावेळी सरकारकडूनही त्यांना काही मदत मिळाली नव्हती. तेव्हा 15 वर्षीय श्याम लाल पुढे आले. त्यांनी गावातील एक जागा निवडली आणि तेथे खोदकाम सुरू केलं. ज्यावेळी श्याम लाल यांनी काम सुरू केलं तेव्हा सुरूवातीला गावातील लोक त्यांना हसायचे. पण तरिही श्याम लाल यांनी न थांबता काम सुरूच ठेवलं. श्याम लाल यांनी केलेलं काम हे बिहारच्या दशरथ मांझी यांच्यासारखं असल्याची चर्चा आता त्या गावात सुरू झाली आहे. बिहारचे माऊंटन मॅन दशरथ मांझी यांनी 22 वर्ष डोंगरालामधून कापून तेथून रस्ता बनवला होता. 

आता श्याम लाल हे 42 वर्षांचे आहेत. गावात तलाव खोदायचं काम मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला कोणीही मदत केली नाही. सरकार आणि ग्रामस्थ कुणीही मदतीसाठी नव्हतं. पण गावातील लोकांच्या आणि प्राण्यांच्या भल्याचा विचार माझ्या डोक्यात होता. म्हणून मी काम सुरूच ठेवलं, असं श्याम लाल यांनी सांगितलं.

श्याम लाल यांनी गावासाठी केलेल्या या कामामुळे ग्रामस्थ त्यांना आदर्श मानतात. श्याम यांनी खोदलेल्या तलावातील पाण्या गावातील प्रत्येक व्यक्ती उपयोग करतो. श्याम लाल यांनी केलेल्या या कामाचा सगळीकडूनच गौरव केला जातो आहे. महेंद्रगडचे आमदार श्याम बिहारी जायसवाल यांनी श्याम यांचा दहा हजार रूपये देऊन गौरव केलाय