शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांचा राजीनामा, उच्च विधी अधिकाºयांच्या चमूला पुन्हा खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 05:20 IST

देशातील उच्च विधी अधिकाºयांच्या चमूत पुन्हा खिंडार पडले आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर आता सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी राजीनामा दिला आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : देशातील उच्च विधी अधिकाºयांच्या चमूत पुन्हा खिंडार पडले आहे. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यानंतर आता सॉलिसिटर जनरल रणजितकुमार यांनी राजीनामा दिला आहे. सॉलिसिटर जनरल हे विधी अधिकाºयाचे दुसरे वरिष्ठ पद आहे. रोहतगी यांनी गेल्या जूनमध्ये राजीनामा दिल्यानंतर रणजितकुमारही पद सोडतील असे बोलले जात होते. ती चर्चा विलंबाने, पण खरी ठरली.रणजितकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना पद सोडण्यामागील कारण सांगितले. गेल्यावर्षी वडिलांचे निधन झाले व आता आई आजारी आहे. आईची काळजी घ्यायची आहे असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी शासनासंदर्भात काहीच तक्रार नसल्याचे स्पष्ट केले.परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अख्त्यारितील कार्मिक विभागाने तीन महिन्यांपूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे विधी अधिकाºयांमध्ये अनिश्चिततेची भावना बळावली आहे. विधी अधिकाºयांची मुदतवाढाुढील आदेशापर्यंतच राहील असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात कार्यकाळाचा निश्चित उल्लेख करण्यात आलेला नाही. रोहतगी व रणजितकुमार यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यापूर्वी दोघांनाही त्यांचा कार्यकाळ आणखी तीन वर्षांपर्यंत किंवा शासन सत्तेत असेपर्यंत म्हणजे, मे-२०१९ पर्यंत वाढविला जाईल अशी अपेक्षा होती. दरम्यान, शासनाची रोहतगी यांना पदावर कायम ठेवण्याची तयारी असतानाही त्यांनी अधिसूचना अमान्य करून राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर रोहतगी यांनी खासगी वकिली करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांच्यासोबत रणजितकुमारही राजीनामा देतील असे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही व आता वैयक्तिक कारणांमुळे पद सोडले. अलीकडे ते सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची प्रकरणे हाताळत नाहीत.

टॅग्स :GovernmentसरकारIndiaभारत