नवी दिल्ली - चिनी सैन्याने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लडाखमधील एलएसीवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करणाऱ्या चीनसमोर भारताने आपले लष्कर उभे केले आहे. दरम्यान आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेत. आता लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत. भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे.
LAC वर तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार, चिन्यांवर होणार तगडा प्रहार
By बाळकृष्ण परब | Updated: October 6, 2020 22:44 IST
Indian army News : आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या या जवानांना आता अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स मिळणार आहेत.
LAC वर तैनात जवानांना मिळणार घातक अमेरिकन हत्यार, चिन्यांवर होणार तगडा प्रहार
ठळक मुद्देअमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्सच्या करारामधील पहिल्या ७२ हजार रायफल्स भारतात आल्या आहेतलष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या भारतील लष्कराला आपल्या दहशतवादविरोधी अभियानासाठी सि सॉयर असॉल्ट रायफलचा पहिला शस्त्रसाठा मिळाला आहे