शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामामध्ये चकमकीत एक लष्करी जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:27 IST

दहशतवाद्याचा केला खात्मा; एका जखमी जवानावर उपचार सुरू

पुलवामा : काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यातील कामराझीपोरा भागामध्ये बुधवारी पहाटे दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला, तर एका दहशतवाद्याचा जवानांनी खात्मा केला. या चकमकीत आणखी एक जवान जखमी झाला आहे.ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटू शकलेली नाही. शहीद झालेल्या जवानाबद्दल अद्याप पूर्ण माहिती हाती आलेली नाही. कामराझीपोरा भागामध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळताच लष्करी जवानांनी तिथे शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. लष्करी जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला आहे.दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यातील एका जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसºया जखमी जवानावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याकडून एक एके रायफल व काही ग्रेनेड जप्त करण्यात आली. काश्मीरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलाने कुपवाडा येथे नियंत्रण रेषेजवळील भागात हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यासह पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.बंदोबस्तात वाढस्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडू नयेत यासाठी तेथील बंदोबस्त आणखी कडक करण्यात आला आहे. जम्मू तसेच काश्मीर खोºयात महत्त्वाच्या ठिकाणी वाहनांची अधिक बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. जम्मूतील मिनी स्टेडियम येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.कोरोना साथीमुळे यंदा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम खूप कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जम्मू-पठाणकोट, जम्मू-श्रीनगरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची कसून तपासणी सुरू आहे. ट्रकमधून दहशतवादी तसेच शस्त्रसाठ्याची वाहतूक केली जाते, असे निदर्शनास आल्याने हे पाऊ ल उचलण्यात आले आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान