शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सोहराबुद्दीन एन्काउंटर खटला : गुजरातचे माजी डीआयजी वंजारा यांची मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 16:17 IST

गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुजरातचे माजी पोलीस डीआयजी डीजी वंजारा आणि  आयपीएस अधिकारी दिनेश एमएन यांना आरोपातून मुक्त केले आहे.

मुंबई, दि. 1 -  गुजरातमधील बहुचर्चित सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुजरातचे माजी पोलीस डीआयजी डीजी वंजारा आणि  आयपीएस अधिकारी दिनेश एमएन यांना आरोपातून मुक्त केले आहे. या दोघांवरही सोहराबुद्दीन याला खोट्या चकमकीत मारल्याचा आरोप होता. या आरोपामुळे वंजारा यांना अनेक वर्षे तुरुंगात राहावे लागले होते. सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणी वंजारा यांना 2014 रोजी जामीन मिळाला होता. या दोघांनाही सबळ पुराव्याअभावी मुक्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सोहराबुद्दीन खटल्यातून मुक्तता करण्यात आल्यानंतर वंजारा म्हणाले,"आम्हाला आरोपमुक्त करण्यात यावे यासाठी आम्ही न्यायालयात निवेदन दिले होते. अखेर आज आम्हाला निर्दोष घोषित करण्यात आले आहे. भारतीय न्यायव्यवस्था संथगतीने काम करत असेल. मात्र ती न्याय देते."  2005 साली झालेल्या सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी डी.जी. वंजारा यांना 24 एप्रिल 2007 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2014 साली मुंबईतील एका न्यायालयाने वंजारा यांना सोहराबुद्दीन शेख आणि तुलसी प्रजापती यांच्या कथित एन्काउंटर प्रकरणी जामीन दिला होता. तसेच प्रजापती यांना गुजरातमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. मात्र गेल्या वर्षी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना गुजरातमध्ये जाण्याची आणि वास्तव्य करण्याची परवानगी दिली होती.  वंजारा यांनी अनेक संशयितांचे बनावट एन्काउंटर केल्याचा आरोप आहे. त्यामध्ये सोहराबुद्दीनसोबतच त्याची पत्नी कौसर बी. तुलसीराम प्रजापती, सादीक जमाल, इशरत जहॉ आणि तिच्यासोबत मारल्या गेलेल्या अन्य तीन जणांचा समावेश आहे. आता सोहराबुद्दीन प्रकरणातून त्यांना आरोपमुक्त करण्यात आले आहे.