शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुण घोड्यावरून ऑफिसला जातो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 16:02 IST

ट्रॅफिकला कंटाळून बंगळुरु येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर रुपेश कुमार वर्मा याने आपल्या घरापासून ते ऑफिसपर्यंत घोड्यावरुन सवारी केली. रुपेश कुमार वर्मा याने घोड्यावरुन केलेली सवारी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. 

ठळक मुद्देघरापासून ते ऑफिसपर्यंत घोड्यावरुन सवारी सोशल मीडियात चर्चेचा विषयप्राणी प्रेमी असून लोकांना शाकाहारी होण्यासाठी प्रोत्साहन

बंगळुरु : शहरातील ट्रॅफिकच्या चक्रव्यूहातून वाहने आणि लोक मार्ग काढत असताना आपण नेहमीच पाहतो. अनेकदा तासनतास गाडी जागेवरुन हलतही नसल्याने  चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो. अशाच ट्रॅफिकला कंटाळून बंगळुरु येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर रुपेश कुमार वर्मा याने आपल्या घरापासून ते ऑफिसपर्यंत घोड्यावरुन सवारी केली. रुपेश कुमार वर्मा याने घोड्यावरुन केलेली सवारी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला आहे. रुपेश कुमार वर्मा याचा ऑफिसमधील शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी त्याने घोड्यावरुन जाण्याचा निर्णय घेतला. घोड्यावरुन प्रवास करताना त्याच्या हातात ऑफिसची बॅग होती आणि एक पाटी लावली होती. त्या पाटीवर असे लिहिले होते की, सॉफ्टवेअर इंजिनिअरींग म्हणून काम करण्याचा माझा शेवटचा दिवस आहे. (Last working day as a software engineer\m/) मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. सोशल मीडियात अशाप्रकारे माझ्याकडे पाहिले जाईल, अशी माझी अपेक्षा नव्हती, असे रुपेश कुमार वर्मा याने सांगितले. तसेच, गेल्या आठ वर्षांपासून मी बंगळुरुमध्ये राहत आहे. येथील प्रदुषणाला कंटाळलो असून शहरात मोठ्याप्रमाणात ट्रॅफिक वाढत आहे. मी प्राणी प्रेमी असून लोकांना शाकाहारी होण्यासाठी प्रोत्साहन करत आहे, असेही रुपेश कुमार म्हणाला. 

मुंबईच्या ट्रॅफिकला शाहरूख खान सुद्धा कंटाळला होता...बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त असतो. या अनेक चित्रपटांचे सेट मुंबईबाहेर असल्यामुळे शाहरूखला बरीच कसरत करावी लागत असते. मुंबईतील ट्रॅफिकमुळे या सेटपर्यंत पोहोचेपर्यंत शाहरूखला अक्षरश: नाकीनऊ येत असल्याने त्याने कंटाळून हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. 

टॅग्स :Bengaluruबेंगळूर