शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर आपल्या मागण्या केंद्राकडून मान्य करून घेता येतील - कमल हसन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 03:15 IST

द्रविड संस्कृतीच्या झेंड्याखाली सारा दक्षिण भारत एकवटायला हवा. त्यामुळे आपले म्हणणे ठामपणे केंद्र सरकारपुढे मांडणे व ते मान्य करून घेणे या राज्यांना सहज शक्य होईल

चेन्नई : द्रविड संस्कृतीच्या झेंड्याखाली सारा दक्षिण भारत एकवटायला हवा. त्यामुळे आपले म्हणणे ठामपणे केंद्र सरकारपुढे मांडणे व ते मान्य करून घेणे या राज्यांना सहज शक्य होईल, असे मत प्रख्यात अभिनेता कमल हसन याने व्यक्त केले आहे.राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत कमल हसन याने याआधीच दिले होते. आता तो तामिळनाडूतील रामनाथपुरम या जिल्ह्यातून माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निवासस्थानापासून येत्या २१ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी दौºयाला प्रारंभ करणार आहे.एका तामिळी साप्ताहिकात कमल हसन एक स्तंभ चालवितो. त्या लेखामध्ये त्याने ही माहिती दिली आहे. या लेखात कमल हसन याने पुढे म्हटले आहे की, देशाच्या महसुली उत्पन्नात तामिळनाडू राज्य मोठी भर घालत असते. मात्र, तामिळनाडूतून कररूपाने महसूल गोळा करायचा व तो उत्तर भारतातील राज्यांच्या विकासासाठी वापरायचा, अशी केंद्र सरकारची नीती आहे. संयुक्त कुटुंबात साधारणपणे असेच दृश्य दिसते. घरातील जे कमावते लोक असतात ते कुटुंबातील वयाने लहान असलेल्या व बेरोजगार लोकांची काळजी घेतात. मात्र, लहानग्यांनी थोरल्यांना मूर्ख समजू नये व थोरल्याच्या तोंडचा घास हिसकावून घेऊ नये.कमल हसनला त्याच्या चाहत्यांनी उलगनायगन (जागतिक नेता) अशी उपाधी दिली आहे. द्रविड संस्कृती ही काही तामिळनाडूपुरती मर्यादित नाही. दक्षिण भारतातील इतर राज्येही द्रविड संस्कृतीचे पाईक होऊ शकतात, असे कमल हसन याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)कमल हसन याने दक्षिण भारतातील राज्यांना द्रविडी संस्कृतीच्या झेंड्याखाली एकवटावे, असे जे मत व्यक्त केले त्याची पुढची पायरी म्हणून कमल हसन तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना तसे आवाहनही केले आहे.चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेश), चंद्रशेखर राव (तेलंगणा), सिद्धरामय्या (कर्नाटक), पिनरायी विजयन (केरळ) हे चारही मुख्यमंत्री द्रविड आहेत. जर दक्षिणेची सारी राज्ये द्रविडी संस्कृतीच्या झेंड्याखाली एकवटली तर या राज्यांवर अन्याय करण्याची हिंमत केंद्र सरकारला होणार नाही.

टॅग्स :Kamal Hassanकमल हासन