शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

...त्यामुळे POK मधले पोहोचले होते अभिनंदन यांचे विमान, समोर आली मोठी गडबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 13:48 IST

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान उडवत असलेल्या मिग 21 विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानचा हल्ला परतवताना अभिनंदन वर्धमान उडवत असलेल्या मिग 21 विमानाबाबत मोठी माहिती समोर कंट्रोल रूमकडून पाठवण्यात येत असलेले रेडिओ संदेश अभिनंदन हे सारथ्य करत असलेल्या विमानापर्यंत पोहोचलेच नसल्याची माहिती उघडया प्रकारानंतर केंद्र सरकारने या प्रकरणी महत्त्वपूर्ण घेतला निर्णय

नवी दिल्ली - बालाकोटवरील एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना भारताचे एक विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळले होते. तसेच  वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन वर्धमान उडवत असलेल्या मिग 21 विमानाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ही घटना घडली तेव्हा कंट्रोल रूमकडून पाठवण्यात येत असलेले रेडिओ संदेश अभिनंदन हे सारथ्य करत असलेल्या विमानापर्यंत पोहोचलेच नसल्याची माहिती उघड झाली आहे.  बालाकोटवर एअर स्ट्राइक करून भारतीय हवाई दलाने पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी करून हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय हवाई दलाने हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान, भारताचे एक मिग 21 विमान पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत जाऊन कोसळले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या विमानातील रेडिओ सिस्टिममध्ये बिघाड झाल्याने कंट्रोल रूमकडून पाठवण्यात येत असलेले संदेश अभिनंदन यांच्यापर्यंत पोहोचत नव्हते. दरम्यान, एअरस्ट्राइकनंतर हवाई दलाच्या उपप्रमुखांनी केंद्र सरकारला या संदर्भातील संपूर्ण अहवाल पाठवला होता. तसेच पूर्ण कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्यावेळी नेमके काय झाले होते. तसेच भविष्यात असा अपघात होऊ नये यासाठी काय करावे लागेल, याचीही माहिती देण्यात आली होती.  या प्रकारानंतर केंद्र सरकारने या प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने असा एक प्रस्ताव तयार केला आहे, त्यानुसार डीआरडीओ एक असे उपकरण विकसित करण्यावर संशोधन करणार आहे जे उपकरण लढाऊ विमानात बसलेला वैमानिक आणि कंट्रोल रूम यांच्यातील दुवा असलेला रेडिओ जॅम होऊ देणार नाही.

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndiaभारत