शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून रजनीकांतच्या 'काला' सिनेमावरून कर्नाटकात 'कल्ला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 19:29 IST

रजनीकांत स्टारर चित्रपट काला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नवी दिल्ली- रजनीकांत स्टारर चित्रपट काला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काला चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला असून, सद्या तरी चित्रपटाचा हा ट्रेलर तमीळ भाषेबरोबरच हिंदी भाषेतही लाँच करण्यात आला आहे. चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये रजनीकांतला गरीब आणि झोपटपट्टीत राहणा-या लोकांचा मसिहा दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं सर्वाधिक चित्रीकरण हे मुंबईतल्या धारावी भागात झालं आहे.या चित्रपटात रजनीकांत गरिबांच्या हक्कांसाठी लढताना दाखवण्यात आला आहे. परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच नवा वाद सुरू झाला आहे. कावेरी मुद्द्यावरून कर्नाटकातल्या चित्रपट वितरकांनी काला चित्रपट थिएटरमध्ये दाखवण्यास नकार दिला आहे. या चित्रपटात नाना पाटेकर एका भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारत आहेत. तसेच या चित्रपटात नाना पाटेकरांना अत्यंत क्रूर दाखवण्यात आलं आहे. जो माझ्या विरोधात असेल, तो मरणार, चित्रपटातला नाना पाटेकरांचा हाच डायलॉग हीट झालाय.दोन मिनिटांत या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत 43 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. चित्रपटातली रजनीकांतची एंट्री रोमांचक दाखवण्यात आली आहे. तसेच त्याचे डायलॉगही भारी आहेत. रजनीकांतचा 'काला' 7 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.