शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा नरेंद्र मोदीं म्हणाले होते बुलेट ट्रेन फक्त दिखाव्यासाठी, जुना व्हिडिओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 11:57 IST

बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ दिखाव्यासाठी असेल, त्यातून लोक प्रवास करणार नाहीत पण त्यातून भारताची ताकद जगाला कळेल असे वक्तव्य केले होते.

मुंबई -  बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी बुलेट ट्रेन ही केवळ दिखाव्यासाठी असेल, त्यातून लोक प्रवास करणार नाहीत पण त्यातून भारताची ताकद जगाला कळेल असे वक्तव्य केले होते. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ 2013 सालचा आहे. त्यावेळी गुजराते मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हा उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी बुलेट ट्रेनबाबतचे आपले मत व्यक्त केले होते. "आपण छोट्या छोट्या नेहमीच करत असतो, पण छोट्या गोष्टींमधून काही साध्य होणार नाही. त्यासाठी मोठे केले पाहिजे."असे मोदी म्हणाले होते. मोदी पुढे म्हणतात,"मी एकदा पंतप्रधानांना भेटलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की संपूर्ण चीनची चर्चा कुठेच होत नाही. ते जगाला फक्त शांघाई दाखवतात. पूर्ण चीन कुठे दाखवतात., त्यामुळे जगाला दाखवण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून मी पंतप्रधानांना सांगितले की अहमदाबाद-मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेन सुरू करा. या बुलेट ट्रेनमध्ये कुणी बसणार नाही. पण जगाला आपल्या गोष्टीचा अंदाज येईल. जगाला दाखवण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात."  दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होऊ लागल्यापासून मोदींवर जोरदार टीका होत आहे. नुकत्याच एल्फिन्स्टन रोड येथे पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वसामान्यांमधून बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. तसेच मनसेसह अनेक राजकीय पक्षांनीही बुलेट ट्रेनला विरोध दर्शवला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBullet Trainबुलेट ट्रेनMumbaiमुंबईGujaratगुजरात