शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
2
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
3
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
4
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
6
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
7
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
8
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
9
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
10
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
11
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
12
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
13
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
14
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
15
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
16
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
17
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
18
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
19
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
20
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

... म्हणून टक्केवारी घोषित करायला उशीर, दिल्ली विधानसभेसाठी 62.59 % मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 7:53 PM

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील

नवी दिल्ली - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी नेमकं किती टक्के मतदान झालं, हे लवकर समजलंच नाही. कारण, निवडणूक आयोगाने आकडेवारीच जाहीर केली नव्हती. निवडणूक आयोगाच्या शेवटच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 53 टक्के मतदान झाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने रविवारी उशिरा दिल्लीतील विधानसभा निवडणुकातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. तर, केजरीवाल यांच्याकडून केलेल्या कामाला जनतेसमोर ठेवत प्रचार सुरू होता. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरली. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत.

विधानसभेच्या मतदानानंतर मतदानाची आकडेवारी जाहीर न केल्यामुळे निवडणूक आयोगावर टीका करण्यात आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला होता. अखेर, निवडणूक आयोगाने कामाचा ताण, आणि अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यस्ततेमुळे टक्केवारी जाहीर करण्यास उशिर झाल्याचे सांगितले. तसेच, दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये 62.59 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या विधानसभेला दिल्लीत 67.1 टक्के मतदान झाले होते. बल्लीमरान येथे सर्वाधिक 71.6 टक्के मतदान झाले असून दिल्ली कँट येथे सर्वात कमी म्हणजेच 45.4 टक्के मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मतदानच्या अंतिम टक्केवारीची एक प्रक्रिया असते. मतदान प्रकियेनंतर जेव्हा डेटा येतो, तेव्हा तो सर्वत्र जोडला जातो. त्यानंतरच, डेटा शेअर करण्यात येतो. त्यासाठी वेळ लागतो, म्हणून उशि झाल्याचं आयोगाने स्पष्टीकरण दिलंय.  

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालVotingमतदानdelhi electionदिल्ली निवडणूक