शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Karunanidhi Death Update : म्हणून करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले होते स्टॅलिन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 06:12 IST

Karunanidhi Death Update : करुणानिधी यांनी आपली दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्राला स्टॅलिन हे नाव ठेवण्यामागे एक विशिष्ट कारण होते. 

तामिळनाडू - तब्बल पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे डीएमकेचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे आज निधन झाले. तामिळनाडूच्या राजकारणावर प्रदीर्घ प्रभाव पाडणाऱ्या करुणानिधी यांनी आपले तिसरे पुत्र एम. के स्टॅलिन यांना आपला राजकीय वारस घोषित केले होते. करुणानिधी यांनी आपली दुसऱ्या पत्नीपासून झालेला पुत्राला स्टॅलिन हे नाव ठेवण्यामागे एक विशिष्ट कारण होते. ते कारण म्हणजे पन्नासच्या दशकात जागतिक राजकारणामध्ये रशियाचे राष्ट्रपती जोसेफ स्टॅलिन यांचा दबदबा होता. दुसऱ्या महायुद्धात निर्णायक नेतृत्व करणाऱ्यांपैकी स्टॅलिन हे एक होते. या स्टॅलिन यांचा मृत्यू 5 मार्च 1953 रोजी झाला होता. त्यापूर्वी पाच दिवस आधी 1 मार्च 1953 रोजी करुणानिधी यांना पुत्ररत्न झाले होते. जोसेफ स्टॅलिन यांच्या नावावरूनच करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे नाव स्टॅलिन असे ठेवले. 

करुणानिधी यांनी तामिळ चित्रपट सृष्टीमधील एक पटकथा लेखक म्हणून कारकीर्दीस प्रारंभ केला होता. तसेच आपली बुद्धिमत्ता आणि वकृत्व कौशल्याच्या जोरावर ते लवकरच कुशल राजकारणी बनले. द्रविड आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. जस्टिस पार्टीचे के. अलगिरिस्वामी यांच्या एका भाषणावर प्रभावित होऊन करुणानिधी यांनी वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला होता. तसेच तामिळनाडूत सुरू झालेल्या हिंदीविरोधी आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या भागातील तरुणांसाठी एका संघटनेची सुद्धा स्थापना केली होती.  प्रतिभावंत असलेल्या करुणानिधी यांचे तामिळ भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी अनेक पुस्तके, कादंबऱ्या, नाटके आणि अनेक तामिळ चित्रपटांचे संवाद लेखन केले होते. चित्रपट सृष्टीमधून राजकारणात उतरल्यानंतर आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी एकाही निवडणुकीत पराभव स्वीकारला नव्हता. तामिळनाडूमधील त्यांचे समर्थक त्यांना कलाईनार अर्थात कलेचा विद्वान म्हणून संबोधत असत.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीTamilnaduतामिळनाडूKarnatakकर्नाटक