शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कावेरी पाणी वाद...म्हणून 'द बॉस' रजनीकांतला शपथविधीला बोलावणार कुमारस्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 11:40 IST

नदीवर कोणत्याच राज्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणा-या पाण्यात कपात करताना कर्नाटकचा वाटा काहीसा वाढवला आहे.

बंगळुरू- नदीवर कोणत्याच राज्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीतून तामिळनाडूला मिळणा-या पाण्यात कपात करताना कर्नाटकचा वाटा काहीसा वाढवला आहे. त्यानंतर तामिळनाडू सरकारसह चित्रपट अभिनेते कमल हसन आणि अभिनेते रजनीकांत यांनी या पाणीवाटपाला विरोध केला. तसेच कावेरी व्यवस्थापन मंडळ (सीएमबी) स्थापन करण्यास होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ तमीळ चित्रपटसृष्टीने एक दिवसाच्या उपोषणात भाग घेतला होता.वल्लूवरकोट्टम येथे झालेल्या या उपोषणात प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत व कमल हासन सहभागी झाले होते. त्याच मुद्द्यावर कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी भाष्य केलं आहे. मी रजनीकांत यांना शपथविधी सोहळ्याला बोलावून जलाशयातील पाणीपातळी दाखवणार आहे. जलाशयात पाणी पुरेसे नाही. मला विश्वास आहे ते समजून घेतली, असं कुमारस्वामी म्हणाले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ व पुद्दुचेरीमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपाबाबत केंद्राने कावेरी व्यवस्थापन योजनेचा मसुदा सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.केंद्रीय जल संसाधन सचिवांनी हा मसुदा न्यायालयाकडे सोपविला. गेल्या काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. या प्रकरणात पाणीवाटप लवादाने 2007मध्ये दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. लवादाने तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पुद्दुचेरी यांच्या वाट्याचे पाणी ठरवून दिल्यानंतरही कर्नाटकने पाणी न सोडल्याने तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे तामिळनाडून सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. गेल्या वर्षी याची सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने कर्नाटकाच्या वाट्याचे पाणी 14.75 टीएमसीने वाढवले आहे. तर तामिळनाडूचे पाणी 14.75 टीएमसीने कमी केले आहे. पुद्दुचेरीला 7 टीएमसी व केरळच्या वाट्याला 30 टीएमसी पाणी आले आहे. हे वाटप पुढील 15 वर्षांसाठी लागू असेल. कावेरीच्या पाण्यावर कर्नाटकइतकाच तामिळनाडूचाही अधिकार आहे, असा दावा तामिळनाडू सरकारने केला होता.

टॅग्स :Kaveri water disputeकावेरी पाणी वादKarnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८kumarswamyकुमारस्वामी