शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

प्रवाशांसाठी खूशखबर! धुक्यामुळे ट्रेन लेट झाल्यास SMS वर मिळणार माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 10:04 IST

धुक्यामुळे अनेकदा ट्रेन उशिराने धावत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे.

ठळक मुद्देधुक्यामुळे ट्रेनला उशिरा झाला तर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना त्याची माहिती मिळणार. प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धुक्यामुळे लेट होणाऱ्या ट्रेन्सच्या संख्येत घट झाली आहे.

नवी दिल्ली - धुक्यामुळे अनेकदा ट्रेन उशिराने धावत असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. कारण आता धुक्यामुळे ट्रेनला उशिरा झाला तर एसएमएसच्या माध्यमातून प्रवाशांना त्याची माहिती मिळणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी बुधवारी (6 नोव्हेंबर) याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी फोनवर एसएमएसच्या माध्यमातून ट्रेनचं लोकेशन सांगितलं जाईल. तसेच किती वेळात ट्रेन स्थानकात पोहचू शकते याबाबतही माहिती देण्यात येणार आहे. प्रवाशांना खूप वेळ ट्रेनची वाट पाहायला लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

थंडीच्या दिवसात धुक्यामुळे ट्रेन या लेट होत असतात. मात्र याचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतो. यंदा रेल्वे प्रशासनाने याची खबरदारी घेतली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धुक्यामुळे लेट होणाऱ्या ट्रेन्सच्या संख्येत घट झाली आहे. यंदा 15 टक्के सुधारणा झाली असून 71 टक्के ट्रेन्स या आपल्या वेळेवरचं स्थानकात दाखल झाल्या आहेत. तसेच प्राथमिक सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या वेळेत बऱ्याच अंशी सुधारणा झाली आहे. ट्रेन आपल्या वेळेत स्थानकात पोहतच असल्याने ही आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तसेच थंडीच्या दिवसात धुक्याचा फटका रेल्वे सेवेला बसू नये यासाठी उत्तम खबरदारी घेण्यात येत आहे. साधारणत: 15 डिसेंबरनंतर रेल्वेला धुक्याचा फटका बसण्यास सुरुवात होते. मात्र यंदा उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. ट्रेनमध्ये धुक्यापासून वाचण्यासाठी फॉग सेफ्टी डिव्हाईस लावण्यात आले आहे. लोको पायलटला फॉग सेफ्टी डिव्हाईसच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिज्युअल क्यू सिग्नल देतील. ते सिग्नल जवळ येतच ट्रेनचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे डिव्हाईस काम करणार आहे. 

प्रवाशांना रेल्वेचे तिकीट सहजरित्या काढता यावे, यासाठी रेल्वेकडून सुविधा देण्यात येत असतात. अधिकृत रेल्वे एजंटच्या माध्यमातून तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे कारण आता OTP च्या मदतीने ई-तिकीटवर प्रवाशांना रिफंड मिळणार आहे. यासाठी आयआरसीटीसी ओटीपी आधारित प्रणाली आणली आहे. प्रवाशांना टिकीट कॅन्सल करण्यासाठी आयआरसीटीसीच्याद्वारे देण्यात आलेल्या पासवर्डच्या मदतीने रिफंड मिळण्याची सुविधा देण्यात येणार आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीने (IRCTC) ही सुविधा केवळ अधिकृत एजेंटच्या माध्यमातून बूक करण्यात येणाऱ्या ई-तिकीटांवर लागू असणार असल्याची माहिती दिली आहे. ओटीपी आधारित रिफंड प्रक्रिया ही प्रवाशांच्या फायद्याची आहे. त्याचबरोबर यामुळे व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणार आहे. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे