शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणींचे सोनिया गांधींशी अयोग्य वर्तन, काँग्रेसचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:31 IST

स्मृती इराणी म्हणाल्या : मी कोण आहे, तुम्हाला माहिती नाही

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणीकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात लोकसभेत गुरुवारी शाब्दिक चकमक झाली. काँग्रेसने म्हटले आहे की, स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी अयोग्य व अवमानकारक वर्तन केले. तथापि, सोनिया गांधी भाजपच्या खा. रमा देवी यांच्या जवळ गेल्या व अधीर रंजन चौधरी यांनी त्यांच्या चुकीसाठी माफी मागितलेली आहे, हे सांगितले. एवढ्यात स्मृती इराणी यांनी बोलण्यास प्रारंभ केला. त्या म्हणाल्या की, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या वतीने माफी मागावी. त्यावर सोनिया गांधी म्हणाल्या की, मी तुमच्याशी बोलत नाही.  त्यावेळी तेथे उपस्थित असलेले विरोधी पक्षांच्या व काँग्रेसच्या खासदारांनी ‘लोकमत’ला सांगितले की, त्यानंतर भाजपच्या महिला व पुरुष खासदारांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. संसदेत दिवसभर याच मुद्द्याची चर्चा सुरू होती. 

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, यासाठी भाजपने काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर निदर्शनेही केली. काँग्रेसचे मीडिया सरचिटणीस जयराम रमेश यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, ही कोणती मर्यादा आहे? एक खासदार सहकारी खासदाराशी बोलूही शकत नाही का? स्मृती इराणी राजकीय पद्धतीने आपली बाजू मांडू शकतात. त्या एक वरिष्ठ खासदार व एका पक्षाच्या अध्यक्षांशी अशा हेकेखोर पद्धतीने का वागत आहेत? हे संसद व राजकीय मर्यादेच्या विरोधात आहे. राजकीय विरोध त्याच्या जागी असून, एखाद्या वरिष्ठ खासदारांशी अशा प्रकारचे वर्तन योग्य आहे का? 

त्यांच्यावर टीका करण्याचा इराणींचा दीर्घ इतिहासn    काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांच्यात गुरुवारी झालेला वाद पहिल्यांदाच झालेला नाही. दरवेळी सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्याचा स्मृती इराणी यांचा दीर्घ इतिहासआहे. n    भाजप किंवा पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध सोनिया गांधी यांनी केलेल्या भाषणाचा किंवा वक्तव्यावर बोलण्याची जबाबदारी भाजप स्मृती इराणी यांना देते. भाजपच्या रणनीतीतील त्या सोनिया गांधी यांच्याविरुद्धच्या सर्वांत मोठे अस्त्र आहे.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी