शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

स्मृती इराणींचा दबदबा ओसरतोय?

By admin | Updated: April 16, 2015 23:48 IST

एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतल्या समजल्या जाणाऱ्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा पूर्वीसारखा दबदबा आता राहिलेला नाही असे दिसते.

मनुष्यबळ विकासमंत्री : ओएसडीला परवानगी नाकारली, राष्ट्रीय कार्यकारिणीतूनही पत्ता साफहरीश गुप्ता - नवी दिल्लीएकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतल्या समजल्या जाणाऱ्या मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा पूर्वीसारखा दबदबा आता राहिलेला नाही असे दिसते. पहिले राष्ट्रीय कार्यकारिणीतून पत्ता कट आणि पसंतीच्या विशेष अधिकाऱ्याची (ओएसडी) नियुक्ती नाकारली जाणे, यावरून याची प्रचीती यावी.इराणी यांनी संजय कचरू यांना त्यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्याबाबत मागितलेली परवानगी सरकारने नाकारली असून त्यांच्यासाठी हा आणखी एक मोठा हादरा आहे. आपल्या नियुक्तीला परवानगी मिळेल या आशेवर कचरू मागील दहा महिन्यांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयात कार्यरत आहेत. यापूर्वी ते एका आघाडीच्या कॉर्पोरेट हाऊसमध्ये व्हाईस पे्रसिडेंट होते; परंतु इराणींसोबत काम करण्यासाठी त्यांनी एवढ्या महत्त्वाच्या पदावर पाणी फेरले. दरम्यान, कुठल्याही औपचारिक मंजुरीशिवाय कचरू यांनी शास्त्री भवनातील मनुष्यबळ विकास मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणे सुरूच ठेवले होते; परंतु गेल्याच आठवड्यात कचरू यांना विशेष अधिकारी पदी नियुक्तीला परवानगी देता येणार नाही, असे पंतप्रधान कार्यालयातर्फे मंत्र्यांना कळविण्यात आले आहे. यापूर्वीही गृहमंत्री राजनाथसिंग, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंग आणि इतरही काही मंत्र्यांना आपल्या पसंतीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास पंतप्रधान कार्यालयाने मज्जाव केला होता. कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्यासाठी १५ खासगी कर्मचारी नियुक्तीला मंजुरी देण्यात आली असून मंत्र्यांसोबतच त्यांचाही कार्यकाळ संपेल अशी व्यवस्था आहे; परंतु काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रालयात कार्यरत व्यक्तीस विद्यमान सरकारमध्ये नियुक्तीची परवानगी दिली जाणार नाही, हे मोदी यांनी स्पष्ट केले होते. इराणी यांचा मोठ्या गाजावाजासह केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला होता. त्या सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री असून लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी लढा दिल्याची बक्षिसी त्यांना मिळाली होती; परंतु भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्यापासून इराणी यांचा राजकीय आलेख घसरत चाललाय एवढे मात्र नक्की. इराणी या धक्क्यातून सावरत नाही तोच कचरूंची नियुक्ती नाकारून त्यांना दुसरा हादरा देण्यात आला. १ मनुष्यबळ विकास मंत्रालयात एकामागून एक वादांची मालिकाच सुरूअसल्याने इराणींकडे कदाचित दुसऱ्या मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाईल, अशीही चर्चा आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयात काम करण्यास अनिच्छा दर्शविली असून इतरत्र बदलीची मागणी केली आहे. २ इराणी ही जबाबदारी सांभाळण्यात सक्षम नसल्याची धारणा निर्माण झाली आहे, यात काही शंका नाही. त्यातच संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच बदलण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. भरीसभर प्रदीर्घ काळापासून शैक्षणिक पद्धतीवर वर्चस्व असलेल्या शक्तिशाली गटांचा रोषही त्यांनी ओढवून घेतला आहे.३ सरकारमधील सूत्रांच्या सांगण्यानुसार कचरू यांना परवानगी नाकारण्याच्या निर्णयातून कुणी फारसा काही अर्थ लावू नये. कारण यापूर्वी विविध मंत्र्यांच्या जवळपास दोन डझन सहकाऱ्यांना नियुक्ती नाकारण्यात आली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काही राजकीय बदल करणे आवश्यक होते. एकदा या निवडणुका आटोपल्या की पुन्हा पक्षातही निश्चित बदल झालेले दिसतील.